Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार

najarkaid by najarkaid
February 14, 2020
in जळगाव
0
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार
ADVERTISEMENT

Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी कृषिमंत्री शरदरावजी पवार, दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव  – अखिल भारतीय पातळीवर कृषी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून लौकिक प्राप्त केलेल्या ‘पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च–तंत्र पुरस्कार’ वितरण सोहळा शनिवार15 फेब्रुवारी 2020रोजी दुपारी 12.00 वाजता ‘आकाश‘ जैन हिल्स जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण हे 2018 या वर्षाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, भारताचे माजी कृषिमंत्री मा. शरदरावजी पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठामंत्री ना.गुलाबराव पाटील, कृषिमंत्री मा. दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आणि आमदार आदी मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 

भारतीय कृषिक्षेत्राला स्व. आप्पासाहेब पवार यांनी उच्च कृषितंत्रज्ञानाची दृष्टी देऊन कृषी शिक्षण विस्तारासाठी आपले आयुष्य वेचले. राज्याच्या कानाकोपर्‍यातील शेताच्या बांधाबांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्‍यांना उच्च तंत्रज्ञानाच्या उपयोगीतेबाबत जागरूक केले. त्यांच्या या प्रेरणादायी आणि प्रभावशाली कार्याला अभिवादन म्हणून त्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येत असतो. या पुरस्कारास एक तपाहून अधिक वर्ष होत आहे. सन्मानचिन्ह, दोन लाख रुपये व सपत्नीक पुरस्कारार्थींचा सत्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ठिबक सिंचनासह आधुनिक कृषी उच्च–तंत्राचा वापर करून अनेकविध कृषी प्रयोगपद्धतीव्दारे बहुमोल योगदान व लक्षणीय उत्पादनार्थ ‘पद्मश्री डॉ. आप्पासाहेब आधुनिक कृषि उच्च–तंत्र पुरस्कार‘ मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील प्रगतशिल शेतकरी श्री. दत्तात्रय भानुदासराव चव्हाण यांची निवड पुरस्कार निवड समितीने केली आहे. या पुरस्कारार्थींच्यानिष्पक्ष निवडीसाठी माजी कुलगुरू डॉ. एस.एस. मगर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी शास्त्रज्ञांची निवड समिती असून या समितीमार्फत निवड केली जाते. या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त सेवादास दलुभाऊ जैन, कविवर्य ना.धों. महानोर यांनी केले आहे.

पुरस्कारार्थी शेतकऱ्याचे कार्य व परिचय थोडक्यात

फळबाग आणि मिश्र शेती आणि आधुनिक कृषी उच्चतंत्राचा अवलंब करून सौभाग्यवतीचीही मदत घेत स्मार्ट शेती करणारे 43 वर्षीय प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण हे 150 एकर शेती कसतात. त्यांनी फळबाग व भाजीपाला पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. पूर्णवेळ शेतीमध्ये ते काम करतात. त्यांचे 30 सदस्य असलेले कुटुंब आहे. वडिलोपार्जित 150 एकरात त्यात त्यांनी सीताफळ, द्राक्षे, डाळिंब, पपई, तूर, मका, ज्वारी, भाजीपाला या पिकांची लागवड केलेली आहे. त्यांच्याकडे 6 आणि 4 कोटी लिटर्स पाण्याची क्षमता असलेले 2 शेततळे असे पाण्याचे स्त्रोत आहे. सिंचनासाठी 11 विहिरी आणि सौर ऊर्जेवर चालणारे 5 अश्वशक्तीचे 4 पंप, विजेवर चालणारे 7 पंप आहेत. त्यांचा यांत्रिकीकरणासह केल्या जाणाऱ्या शेतीवर भर आहे. त्यासाठी ट्रॅक्टर, ब्लोअर, एचटीपी पंप, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, ट्रॉली, मालवाहू पिकअप व्हॅन वगैरे आहेत. शेतीमध्ये सेंद्रीय बाबीचा समावेश व्हावा यासाठी ते गोवंश संगोपन देखील करतात. त्यांना द्राक्ष फळ प्रदर्शन पुरस्कार (2006), वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार (2007), आयडीयल फार्मर पुरस्कार (2016) आणि अलीकडेच भारतीय अनुसंधान परिषद पुण्याचा द्राक्ष गौरवचिन्ह देऊन त्यांचा सन्मान यापूर्वी झालेला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जळगाव दौरा; जाणून घ्या मिनिट टू मिनिट दौरा !

Next Post

रेडिओचा जनक गुग्लीमो मार्कोनी यांच्या  शोधामुळे जगात संवाद क्षेत्रात क्रांती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
रेडिओचा जनक गुग्लीमो मार्कोनी यांच्या  शोधामुळे जगात संवाद क्षेत्रात क्रांती

रेडिओचा जनक गुग्लीमो मार्कोनी यांच्या  शोधामुळे जगात संवाद क्षेत्रात क्रांती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us