इस्लामाबाद – दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिजला दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे.
मागील वर्षी लाहोरमधील दहशतवादविरोधी कोर्टाने बंदी असलेल्या जमात-उद-दवा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईदविरोधातील दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये निकाल राखून ठेवला होता. हे खटले दहशतवादविरोधी पथकाच्या लाहोर आणि गुजरावाला शाखेच्यावतीने दाखल करण्यात आले होते.














