जळगाव-महाराष्ट्र शासनाच्या एकच लक्ष 33 कोटी वृक्ष लागवड या अभियानांतर्गत सोमवार १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाक्षक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते रामदेववाडी, वावडदा रोड, जळगाव येथे वृक्षरोपण कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे राहणार आहेत. तर कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. श्रीमती उज्वला पाटील, खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेश पाटील, आमदार डाॅ. सुधिर तांबे, आमदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सर्वश्री. चंदुलाल पटेल, किशोर दराडे, एकनाथराव खडसे, डॉ. सतिश पाटील, संजय सावकारे, हरीभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, किशोर पाटील यांचेसह मुख्य वनसंरक्षक धुळे श्री. ए. एस. कळसकर, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. प्रकाश मोराणकर, विभागीय वन अधिकारी सामाजिक वन विभाग, जळगाव श्री. सै. ई. शेख, सहायक वनसंरक्षक श्री. चि. रा. कांबळे, श्री. के. आर. फंड, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एन. जी. पाटील आदि उपस्थित राहणार आहेत.
वृक्षारोपणाच्या शुभारंभ कार्यक्रमात रामदेववाडी येथे 2 हेक्टर क्षेत्रावर 3200 रोपांचे रोपण करण्यात येणार असून त्यासाठीचे सर्व खड्डे खोदून तयार झाले आहेत. वृक्षारोपण हे राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येकाने अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी 1 जुलै रोजी होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. दिगंबर पगार यांनी केले आहे.
000
नियोजन भवनात आज सांख्यिकी दिनाचे आयोजन
जळगाव, दिनांक 28 – विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जन्मदिनानिमित्त आज (29 जून) रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सांख्यिकी दिनाचे आयोजन करण्यातआले आहे. यावेळी सांख्यिकी दिनाच्या श्वाश्वत विकासाची ध्येय या संकल्पनेवरील विषयावर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे. तरी या कार्यक्रमास शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव पाटील यांनी केले आहे.