मुंबई – उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात ट्रान्सलेटर जागांसाठी भरती करण्यात येणार असून नुकतीच या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी 10 फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहे. तुम्ही हे अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरू शकता. आज आम्ही तुम्हाला या भरतीची प्रक्रिया अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि इतर माहिती देणार आहोत.
05 मार्च ट्रान्सलेटर या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत असून तुम्हाला https://hcraj.nic.in/hcraj या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ट्रान्सलेटर पदांसाठी राजस्थान उच्च न्यायालयात नोकर भरती निघाली असून हा अर्ज 10 फेब्रुवारीपासून ऑनलाईन भरता येणार आहे. या पदांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट असणाऱ्या किंवा करणारे तरुण अर्ज भरू शकतात.
15 जागा रिक्त जागांसाठी असलेल्या या नोकर भरतीसाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांपर्यंत उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात. 500 रुपये जनरल, ओबीसी, ईडब्लूएससाठी परीक्षा शुल्क प्रतिउमेदवार असणार आहे. तर 350 रुपये परीक्षा शुल्क SC/ST साठी आकारण्यात येणार आहे.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने https://hcraj.nic.in/hcraj या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर रजिस्ट्रेशन करून आपली माहिती भरावी लागेल. त्यानंतर उमेदवाराने पदासाठी अर्ज करावा लागले. त्यानंतर माहिती भरून परीक्षा शुल्क भरावे. हे झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एक रिसिट मिळेल ती पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावी.