Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन

najarkaid by najarkaid
January 27, 2020
in जळगाव
0
महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

लोकसहभागातून आदिवासी भागात महिला सक्षमीकरणासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध उपक्रमांना डॉ. अनिल काकोडकर, तुषार गांधी यांची भेट

जळगाव – गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फ बा–बापू 150व्या जयंतीवर्षनिमित्त चोपडा तालुक्यातील बोरअजंटी येथे लोकसहभागातुन वनबंधारा खोलीकरणाच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. यासह अंबापाणी पाझर तलाव, वैजापूर व शेणपाणी पाझर तलाव पुननिर्माणासह आदिवासी महिलांसह शेतकऱ्यांना स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या प्रकल्पांचे औपचारीक उद्घाटन करण्यात आले.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष तथा अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ विश्वस्त दलिचंद जैन, सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ गांधीयन राधाबेन भट, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सौ. अंबिका जैन, वनविभागाचे जिल्हा अधिक्षक पी. टी. मोराणकर, विभागीय वनअधिकारी समाधान सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक वसंत पवार, वनपाल बी. डी. कुंवर, पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या उपस्थित सर्व प्रकल्पांचे उद्घाटन झाले. बोरअजंटी गावातील ग्रामस्थांच्या आवाहनास प्रतिसाद देत लोकसहभागातून वनबंधारा खोलीकरण निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे 9.90 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी अडविले जावून लाखो लिटर पाणीसुद्धा जिरवले जाणार आहे. 30 जानेवारी पर्यंत असलेल्या श्रमसंस्कार निवासीशिबिरामध्ये बोरअजंटीचे सरपंच खुमसिंग पाडवी–बारेला, अशोक पाटील, गोरख धनगर, दिपक धनगर, नितीन कोळी, शिवदास कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक, महात्मा गांधीजींच्या विचारधारेतील समाजकार्य पी. जी. डिप्लोमातील विद्यार्थी, भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, आदिवासी सेवा मंडळ संचलित आश्रमशाळा बोरअजंटी येथील विद्यार्थी, बोरअजंटी गावातील ग्रामस्थ व युवाशक्ती श्रमदानात सहभागी झाले. पशुचिकित्सा केंद्रातील सहकारी सहभागी झाले. या प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शनासह विशेष सहकार्य व परिश्रम जैन इरिगेशन सिस्टिमचे इंजिनियर व सर्वेअर टिम ने केले. प्रकल्प यशस्वीतेसाठी सागर चौधरी, चंद्रकांत, सुधीर पाटील यांच्यासह गांधी रिसर्च फाउंडेशनचे सर्व सहकारी प्रयत्न करीत आहेत.

महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न

अंबापाणी पाझर तलाव, वैजापूर व शेणपाणी पाझर तलाव पुननिर्माणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. कोरडवाहूवरून आता शेतकरी दुबार पीक घेत आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या शेती परवडत असल्याचे दित्तरसिंग बारेला, विजय राजपूत या शेतकऱ्यांनी सांगितले. वैजापूर येथे वाडी प्रकल्पाअंतर्गत परसबाग विकास, गांडुळ खत निर्मिती, गंगा मॉं प्रकल्प, बीज साठवण प्रकल्प, मशरूम उद्योग यामाध्यमातून सातपुडा महिला बचत गट,ओम साई महिला गट, आदिवासी विकास महिला संयुक्त जबाबदारी गटातील महिलांना आर्थिक समृद्धीचा मार्ग मिळाला आहे. असे गट प्रमुख अलका कोळी म्हणतात. या सर्व प्रकल्पांना डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या. गांधी रिसर्च फाउंडेशन आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्न करेल असे प्रोत्साहनही दिले. जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानातून टिश्यूकल्चर केळी, पांढरा कांदा आंतरपीक पद्धतीचे प्रात्यक्षिक नागलवाडी येथील शेतकरी सुनील वानखेडे यांच्या शेतावर मान्यवरांनी बघितले.

सोलरवर सूतकताई उद्योग

बोरअजंटी महिला संयुक्त जबाबदारी गटाच्या प्रमुख इंदुबाई जगन बारेला यांच्यासह दहा महिलांनी मिळून सोलरवर सूतकताई उद्योग उभारला आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे या महिलांना आवश्यक असणारे तंत्रज्ञान दिले जाते तसेच त्यांच्याकडून सूत सुद्धा विकत घेतला जात आहे. यामुळे त्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळाला असल्याचे गटातील महिला म्हणतात.

स्थलांतर थांबले

तीन राज्यांच्या सिमेवर असलेला चोपडा तालुक्यातील हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या उत्तम आहे. मात्र रोजगार नसल्याने परिसरातील स्थलांतर वाढले. थांबण्यासाठी पाण्याची उपलब्धता असली पाहिजे. गावात रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनने दोन वर्षांपासून जनजागृतीसह गावकऱ्यांना संघटित करण्याचे कार्य हाती घेतले. परिणामी पदवीधर युवक गावातच रोजगार निर्माण करीत असून स्थलांतरही थांबले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रायसोनी महाविध्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post

मुळे ज्ञानेश्वर विठ्ठलराव  यांना पीएच. डी 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us