रायसोनीच्या रंगमंचावर रंगली कलामैफल ; कर्मचाऱ्यांच्या अविस्मरणीय कार्यक्रमाने भारावले रसिक
जळगाव – जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये कर्माचा-यांसाठी “नीव” वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा सप्ताह जल्लोषात पार पडला. यावेळी नाटक, मिमिक्री, समूह गायन, समूह नृत्य, एकल नृत्य, व्यक्तिगत गायन, पारंपारिक वेशभूषा, नाटक, बॉलिवूड थीम, फॅशन शो, अंताक्षरी, काव्य वाचन, क्रिकेट, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम, बॅटमिंटन, संगीत खुर्ची, रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कर्मचा-यांना कामातून मोकळीक मिळावी तसेच कामाचा तान कमी व्हावा आणि आपल्या आतील विविध कलागुणांना चालना मिळावी, त्यांच्यातील कलाकार जिवंत राहावा व नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी या उद्देशाने क्रीडा सप्ताह व “नीव” स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल चार दिवस रायसोनी अभियांत्रिकी, बिझनेस मेनेजमेंट, पॉलिटेक्निक व कनिष्ठ महाविद्यालयातील ३०० कर्म-यांनी विविध कला प्रकारात सहभाग घेऊन आयुष्याची नीव पुन्हा मजबूत केली. याप्रसंगी रायसोनी समूहाचे कार्यकारी संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. ए.जी.मॅथ्यु, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.तुषार पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.प्रल्हाद खराटे व आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी यांनी रायसोनी इस्टीट्यूटच्या महत्त्वाच्या शैक्षणिक प्रकल्पांचा आढावा घेत रायसोनी महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यामुळे रायसोनी इस्टीट्यूट सदैव यशोमार्गावरून वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त केला तसेच संचालिका प्रा. डॉ.प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात कर्मचारी आनंदात असतील तरच संस्थेचा विकास होईल. स्नेहसंमेलनासारखे सांस्कृतिक कार्यक्रम कर्मचाऱ्यांना येणारा ताण-तणाव दूर करण्यास साह्यभूत ठरतात. अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यातील कल्पकता व सृजनशीलतेला वाव देतात असे मत व्यक्त केले. तसेच या चार दिवसीय स्नेहसंमेलनाची शिर्डी सहलीने यावेळी सांगता करण्यात आली.
क्रीडा स्पर्धेतील विजयी स्पर्धक अनुक्रमे चेस- प्रथम प्रा.तन्मय भाले, द्वितीय- प्रा.गणेश बडगुजर, क्रिकेट- प्रथम- अॅड्मीन विभाग, द्वितीय- शिपाई विभा, क्रिकेट सामनावीर – अजय चौधरी, ट्रेझर हंट- प्रथम- प्रा.सौरभ नाईक, द्वितीय- प्रा. स्वप्नील जाखेटे, टग ऑफ वॉर – प्रथम- शिपाई विभाग, द्वितीय- अभियांत्रिकी महिला विभाग, बॅटमिंटन- प्रथम- एकल महिला गट- प्रथम- नेहा अलेक्स, द्वितीय- शितल पाटील, पुरुष गट एकल- प्रथम- प्रा.प्रकाश शर्मा, द्वितीय- शिवाजी कुमार, संगीत खुर्ची- प्रथम- चंदू ढाकणे व सोनल पाटील, कॅरम एकल गट पुरुष- प्रथम- प्रा.जे. आर. पाटील, द्वितीय- प्रा. नितेश राठोड, कॅरम डबल- प्रथम- प्रा.राहुल त्रिवेदी, जे. आर. पाटील, टेबल टेनिस डबल- प्रथम- प्रा. अंकुश भिश्नुरकर, प्रा. तन्मय भाले, टेबल टेनिस पुरुष गटात- प्रथम- प्रा. राहुल त्रिवेदी, द्वितीय – प्रा.संजय जाधव, ऐतिहासिक थीम प्रथम – मयूर जाखेटे, द्वितीय- गणेश पाटील, तृतीय- हिरालाल साळुंके व बिपाशा पात्रा, नाटक प्रथम – पॅालीटेक्निक टीम, द्वितीय- वासिम पटेल गृप, तृतीय- बापूसाहेब पाटील व प्रकाश शर्मा, मिमिक्री प्रथम – प्रा. हिरालाल साळुखे, द्वितीय- जे. आर. पाटील व प्रतिभा चिखले, गीत गायन प्रथम – सोनल पाटील, द्वितीय- राज कांकरिया, तृतीय- अरुण पाटील, विशेष पारितोषिक चंद्रकांत ढाकणे, समूह नृत्य प्रथम- सोनल पाटील आणि समूह, द्वितीय- यामिनी जोशी आणि समूह, तृतीय – बापूसाहेब पाटील आणि समूह, एकल नृत्य प्रथम – प्रा.सोनल पाटील, द्वितीय- यामिनी जोशी, फेशन शो बेस्ट वॉक पुरुष – प्रा. दिपक पाटील, प्रशांत देशमुख, महिला – प्रा. गौरी माहाडिक, प्रा.सोनल पाटील तर सर्वोत्कृष्ट अभिनेता बापूसाहेब पाटील तर अभिनेत्री प्रा. सोनल पाटील यांची निवड करून अनुक्रमे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले.