जळगाव,(नजरकैद न्यूज) : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. भूपेंद्र किशोर बाणाईत यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. प्रा. बाणाईत हे भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील रहिवासी असून, त्यांच्या निवडीबद्दल शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील सहकारी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीची ही जिल्हा कार्यकारिणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने तसेच भाजपा नेते व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, जिल्हा प्रभारी अनुपभैय्या अग्रवाल, माजी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार अमोलदादा जावळे आणि आमदार नंदकिशोर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांच्या निवडीमुळे शिक्षक आघाडीच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळण्यास तसेच पक्षाची शैक्षणिक क्षेत्रातील भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.









