पारोळा | प्रतिनिधी – श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे ‘समाज भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच त्यांची राष्ट्रीय कोअर कमिटी अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज, २४ जुलै रोजी पारोळा येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता प्रतितिरुपती श्री बालाजी महाराज मंदिर येथे लोकदर्पण पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला लोकदर्पण पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, आमदार अमोल पाटील, नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, सर्व नगरसेवक, व्यापारी बांधव तसेच मित्रपरिवार उपस्थित राहणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











