जळगाव,(नजरकैद न्युज) दि. २८ फेब्रुवारी:
महाराणा प्रताप यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जळगाव येथे दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, जळगाव येथील महाराणा प्रताप स्मारक येथे सकाळी ठीक १०.०० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार असून कार्यक्रमाला राजपूत समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिहं पाटील यांनी केले आहे.

यावेळी कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, महापौर सौ. दीपमाला काळे, नगरसेवक अॅड नरेंद्र पाटील, नगरसेविका अॅड सौ.सुचिता हाडा, माजी नगरसेवक अतुलसिहं हाडा यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या सोहळ्यास राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे खान्देश विभागीय पदाधिकारी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच सर्व बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक, पुष्पार्पण व अभिवादन करण्यात येणार आहे.यावेळी समाजातील विविध मान्यवरांची उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव जिल्हा टीम, खान्देश विभाग टीम तसेच महिला टीम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.









