Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

najarkaid by najarkaid
February 23, 2026
in Uncategorized
0
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दिनांक 23 फेब्रुवारी ( नजरकैद न्यूज)-: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत केंद्रिय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केद्र सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्या व सुरु असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपवनसंरक्षक जमीर शेख, राम धोत्रे तसेच भुसावळ , रावेर, नशिरबाद, फैसपुर, वरणगावचे नगराध्यक्ष उपस्थित होते.

चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी रेल्वे विभागाच्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजने अंतर्गत प्रस्तावित कामांसदर्भात सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता समन्वयाने कामे पुर्ण करावीत, त्यांच्या अडचणी समजून घेऊन ठरवून दिलेल्या मुदतीत काम पुर्ण करण्याच्या सुचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीत मध्य रेल्वे विभागातर्फे जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली. अमृत भारत, वन स्टेशन-वन प्रोडक्ट, आदी महत्वाच्या प्रकल्पाच्या कामांचा यावेळी आढावा त्यांनी घेतला.

सुरक्षिततेचे निकष पाळणे गरजेचे असून स्थानिक परिस्थितीचा विचार करून कामे पूर्ण करावीत, काही ठिकाणी रेल्वे पुलांच्या जॉईंट एलिमेंट्सच्या दुरुस्तीबाबतही सूचना त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्यात.

बैठकीत रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ प्राधिकरण, महावितरण, जलजीवन मिशन, ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, कृषी, आरोग्य व शिक्षण विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी घेतला.

केंद्र व राज्य सरकारच्या निधीतील सहभाग लक्षात घेता विविध योजनांच्या कामासंदर्भात जिल्ह्यातील खासदारांसमवेत चर्चा करण्यात यावी. तसेच कामांच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार व आमदार दोघांनाही प्रोटोकॉलनुसार निमंत्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कामांचे प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अहवाल तयार करावा, जेणेकरून समन्वयातून कामे वेळेत पुर्ण होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव विमानतळ विस्तारीकरणासंदर्भातील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या विविध विकासकामांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत विकासकामांच्या गतीसाठी समन्वय, पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीला सर्व संबधित विभागांचे प्रमुख, तहसिलदार, नगर पालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

Spread the love
Tags: .#Jalgaoncity#JalgaonNews#RakshaKhadse
ADVERTISEMENT
Previous Post

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

Next Post

US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us