Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण

najarkaid by najarkaid
December 18, 2025
in जळगाव
0
श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, : गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांतर्फे श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त (जयंतीनिमित्त) उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात सूत कताई प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती अशोक जैन यांनी चरखा चालवून या उपक्रमाला औपचारिक सुरुवात केली. आठ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणामुळे दिव्यांग केंद्रातील मुलांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार आहे.

रुशील मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे संचालन केले जाते. या केंद्रातील मुले आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावीत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती जैन यांच्यासमवेत दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालिका हर्षाली चौधरी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई तसेच बरुन मित्रा उपस्थित होते.
प्रास्ताविकात गांधी रिसर्च फाउंडेशनचे शैक्षणिक अधिष्ठाता डाॅ. अश्विन झाला यांनी केले. ज्योती जैन यांचे स्वागत गायत्री भालेराव, दीपाली सुरळकर यांनी त्यांच्या हस्तनिर्मित पुष्पगुच्छाने केले. हर्षाली चौधरी यांचे स्वागत अनिता यादव यांनी केले. तर अब्दुल भाई यांचे स्वागत समीर कोल्हे, कुणाल कोल्हे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

उद्घाटनानंतर गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी दिव्यांग मुलांना चरखा चालवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना संचालिका हर्षाली चौधरी यांनी सांगितले की, “आमची मुले लवकरच सूत कताईत प्राविण्य मिळवतील, याची मला खात्री आहे.” गांधी विचार संस्कार परिक्षेचे गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागून डोके-हृदय-हात यामधील समन्वय वाढेल. या उपक्रमातून रोजगार निर्मिती होऊन मुले स्वावलंबी होतील. याप्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, सुधीर पाटील, दीपक मिश्रा, अजय क्षीरसागर, मयूर गिरासे, अनिलेश जगदाळे, सागर टेकावडे, भूषण अस्वार, सागर पाटील, प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
Tags: bhavarlal-jain-sanjeevan-din-spinning-training-for-differently-abled-children
ADVERTISEMENT
Previous Post

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

Next Post

जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी भाजपाच्या निवडणूक प्रभारीपदी आमदार मंगेश चव्हाण

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी भाजपाच्या निवडणूक प्रभारीपदी आमदार मंगेश चव्हाण

जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी भाजपाच्या निवडणूक प्रभारीपदी आमदार मंगेश चव्हाण

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us