श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे खान्देश विभाग अध्यक्ष विलाससिंह पाटील यांना महाराष्ट्र राज्य राजपूत समाज समन्वयक म्हणून जाहीर करण्यात आले. हा मानाचा निर्णय गुरुवर्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या नियुक्तीचा निर्णय भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, आदरणीय मा. प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आला. त्यामुळे या क्षणाला अधिक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद स्वरूप प्राप्त झाले.
राजपूत समाजात एकसंघता, समन्वय आणि नवे नेतृत्व घडविण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे. खान्देशातून उभं राहिलेलं हे नेतृत्व आता संपूर्ण राज्यात राजपूत समाजाच्या प्रश्नांवर कार्यरत राहील, असा विश्वास या वेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिहं पाटिल यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी बोदवडचे नगरसेवक भरतअप्पा पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्यध्यक्ष प्रविण सपकाळे, रोशन राजपूत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.










