जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील बाबूजीपुरा परिसरात घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. ईदच्या दिवशी हरवलेला पाच वर्षांचा निरागस मोहम्मद हन्नान खान मजीद खान याचा खून करून त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या घटनेने परिसरातील वातावरण चिघळले असून संतप्त नागरिकांनी आरोपीच्या दुकानावर दगडफेक केली आहे.

बालक बेपत्ता, नंतर मृतदेह सापडला
शुक्रवारी ईद-ए-मिलादच्या दिवशी संध्याकाळपासून मोहम्मद हन्नान बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असतानाच शनिवारी सकाळी आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिला (२२) याच्या वडिलांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन मुलाने खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
घरात मृतदेह जाळून पोत्यात लपवला
आरोपी शेख शाहिद याने हन्नानचा खून करून त्याचा मृतदेह घरातच जाळला आणि पोत्यात लपवून ठेवला होता. आश्चर्य म्हणजे, तो पोलिस आणि पीडित कुटुंबीयांसोबत मुलाला शोधत असल्याचे नाटक करीत होता. अखेर पोलिस चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.
शहरात तणावपूर्ण वातावरण
घटनेची माहिती पसरताच परिसरात मोठी गर्दी जमली. संतप्त जमावाने आरोपीच्या दुकानावर दगडफेक केली. पोलिसांनी तातडीने खबरदारीचे उपाय केले असून व्यापाऱ्यांनीही स्वतःहून दुकाने बंद ठेवली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सर्वधर्मीय मोर्चा निषेधार्थ
या अमानवी कृत्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयापासून पोलिस ठाण्यापर्यंत सर्वधर्मीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातून प्रशासनाला निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी होणार आहे.

तपास पोलिसांच्या अखत्यारीत
या प्रकरणी मृत बालकाचे आजोबा यासिन खान नथ्थे खान यांच्या तक्रारीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि उपनिरीक्षक एम. जे. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बालकाच्या खुनामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Latest news :
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?
तुमचा क्रेडिट स्कोर लो आहे का? पर्सनल लोन मिळवण्यासाठी या 6 ट्रिक्स ठरतील उपयोगी!
SIP मध्ये होणाऱ्या गुंतवणूक करतांना या ५ चुका टाळा,अन्यथा…
US Visa Interview Waiver बंद : भारतीय विदयार्थ्यांवर थेट परिणाम,अमेरिकेने घेतला मोठा निर्णय!
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!