जळगाव, दि. २५ ऑगस्ट २०२५ :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना शुद्ध, दर्जेदार आणि स्वादिष्ट दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित या संस्थेच्या ‘विकास’ ब्रँडतर्फे दोन नवी उत्पादने – ‘विकास मावा मोदक’ आणि ‘विकास बेरीफी मोदक’ बाजारात सादर करण्यात आली आहेत.
या नव्या उत्पादनांचे लोकार्पण आज दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी दूध संघाच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या भव्य समारंभात करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संचालक, पदाधिकारी, अधिकारीवर्ग, कर्मचारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्पादनांचे लोकार्पण संस्थेच्या पुढील संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाले:चिमणराव पाटील, संजय पंवार, मधुकर राणे, प्रमोद पाटील, अरविंद देशमुख, नितीन चौधरी, ठकसेन पाटील, पराग मोरे, रावसाहेब भोसले, दगडू चौधरी, शामलताई झांबरे, रमेश पाटील
या प्रसंगी संस्थेचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की,“विकास ब्रँडने आजवर ग्राहकांच्या विश्वासाला सदैव प्राधान्य दिले आहे. गणेशोत्सव हा भारतीय संस्कृतीतील भक्ती, उत्साह आणि एकतेचा उत्सव आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही ‘विकास मावा मोदक’ आणि ‘विकास बेरीफी मोदक’ ही दर्जेदार, शुद्ध आणि पारंपरिकतेला स्पर्श करणारी उत्पादने सादर करत आहोत. ग्राहकांचा विश्वास हेच आमचे बळ असून, दर्जा व चव यातून आम्ही त्याची खात्री देत आहोत.”
याच कार्यक्रमात ‘विकास गवा चिली लस्सी’ या नाविन्यपूर्ण व आरोग्यदायी पेयाचेही लोकार्पण करण्यात आले. पारंपरिक लस्सीला थोडासा हटके व थंडावा देणारा हा प्रकार ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी ‘विकास’ ब्रँडच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेचे व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. नव्या उत्पादनांना गणेशोत्सवात उत्तम प्रतिसाद मिळेल आणि प्रसादासाठीही ही उत्पादने घराघरांत पोहोचतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
‘विकास मावा मोदक’, ‘विकास बेरीफी मोदक’ आणि ‘गवा चिली लस्सी’ ही उत्पादने आता जळगावसह परिसरातील अधिकृत विकास विक्रेत्यांकडे उपलब्ध असून, लवकरच संपूर्ण जिल्ह्यात आणि आसपासच्या भागांमध्ये त्यांचा पुरवठा होणार आहे.
गणेशोत्सवाच्या गोड व भक्तिमय वातावरणात ‘विकास’ ब्रँडने ग्राहकांसाठी खास गोडवा व चव घेऊन येत उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे.
गणेशोत्सव साजरा करा ‘विकास’ च्या चविष्ट आणि दर्जेदार मोदकांसह –
विश्वासाचा स्वाद, शुद्धतेची हमी!