धुळे – जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३९ जागा मिळवून भाजपाने विजय मिळविली आहे. शिरपूर तालुक्यातील सर्वच्या सर्व १४ जागा, शिंदखेडा तालुक्याती ८, साक्री तालुक्यात ७ आणि धुळे तालुक्यात १० जागा मिळविल्या आहेत. काँग्रेसने ७ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ३ आणि शिवसेनेने ४ जागा मिळविल्या आहेत. तर तीन जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. बहुमतांची २९ जागांची मॅजीक फिगर गाठून ३९ जागा मिळवत भाजपाने निर्विवाद बहुमत मिळविले आहे.