Jalgaon Rape Case: जळगावमध्ये रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने बंद घरात नेऊन पाशवी अत्याचार केला. शहर हादरवणारी ही घटना उघडकीस आली आहे.
जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नसून जळगाव जिल्ह्यातून खळबळजनक प्रकार समोर आलाय. ज्यात लघुशंकेसाठी रात्री घराबाहेर अंगणात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना चोपडा तालुक्यात घडली.

संशयित नराधमाने मुलीचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन एका बंद घरात तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणात संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता नराधमाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याबाबत असे की, चोपडा तालुक्यातील सातपुड्यात असलेल्या जिरायतपाडा येथे वास्तव्यास असलेले पीडित कुटुंबातील सर्वजण झोपी गेले. याच दरम्यान रात्री ११ वाजता १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात आली असता ती घरात परत आलीच नाही म्हणून मुलीच्या वडिलांनी रात्रभर जिरायतपाडा गावात शोधाशोध केली परंतु ती कुठेच आढळून आली नाही.

आई,वडिलांसह सर्वच कुटुंब चिंतेत असतांना अंधारात अल्पवयीन मुलगी पहाटे चार वाजेच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत रडत घरी परतली. यावेळी वडिलांनी अल्पवयीन मुलीला विचारले असता तिने सांगितले की,लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात गेली असता माझेवर पाळत ठेवणाऱ्या गावातील तरुणाने दोन्ही हातांनी माझे तोंड व हात बांधून जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन मुलीच्या नातेवाईकाच्या बंद असलेल्या घरात तब्बल पाच तास डांबून ठेवत पहाटे ४ वाजेपर्यंत पाशवी अत्याचार केला. त्यानंतर संशयित तरुणाने मला घरापर्यंत सोडले अशी आपबिती अल्पवयीन मुलीने सांगितली. अत्याचाराच्या घटनेने प्रचंड खडबळ उडाली आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीचे वडिल यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला स्नेहल दिलीप पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,अटक करण्यात आली आहे.पुढील तपास डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शेषराव नितनवरे करीत आहेत.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर