Prajwal Revanna rape case | कर्नाटकातील हासन मतदारसंघाचे माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. उद्या त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.
महत्वाची बातमी : PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹2000 हप्ता,लगेच यादी चेक करा
प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षा सुनावली जाणार | Prajwal Revanna rape case
बंगळुरू, १ ऑगस्ट २०२५: कर्नाटकातील हासन लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. Bangalore येथील विशेष न्यायालयाने आज हा निर्णय दिला असून, उद्या म्हणजेच २ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

न्यायालयीन कार्यवाही आणि निकाल
या प्रकरणात विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांच्या समोर २६ साक्षीदारांची उलटतपासणी पार पडली. अखेर न्यायालयाने प्रज्ज्वल रेवण्णा यांना दोषी ठरवत निकाल जाहीर केला. निकाल ऐकताना रेवण्णा न्यायालयात रडायला लागल्याचे वृत्त ‘The Indian Express’ ने दिले आहे.
घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार
ही घटना २०२१ मध्ये हासन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथे घडली. पीडित महिला (वय ४८) रेवण्णा कुटुंबियांच्या गन्निकाडा फार्महाऊसवर घरकाम करत होती. तिथे प्रज्ज्वल रेवण्णाने दोन वेळा बलात्कार केला आणि त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले. त्याच्यावर एकूण चार बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी या प्रकरणात तो दोषी ठरला आहे.

अश्लील व्हिडीओमुळे उडाली खळबळ
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ज्वल रेवण्णा यांना हासन मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्याच्याशी संबंधित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली.
SIT चा तपास आणि अटक
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमले. SIT ने तब्बल १२० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि पुरावे गोळा केले. प्रज्ज्वल रेवण्णा २६ एप्रिल २०२४ रोजी जर्मनीहून परत आला. त्यानंतर ३१ मे रोजी त्याला अटक करण्यात आली. यानंतर जेडी(एस) पक्षाने त्याला निलंबित केले.
व्हिडीओ बाहेर कसा आला?
प्रज्ज्वल रेवण्णाच्या माजी वाहनचालकाने त्याच्या मोबाईलमधून व्हिडीओ पेनड्राईव्हमध्ये घेऊन भाजप नेत्यांना दिला, यामुळे प्रकरण उघडकीस आले. मात्र, व्हिडीओ सार्वजनिक केल्यामुळे त्या चालकावरही गुन्हा दाखल झाला आहे.

उद्या शिक्षा सुनावली जाणार
आता न्यायालयाने प्रज्ज्वल रेवण्णा यांना बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवले आहे. उद्या न्यायालय त्याला कोणती शिक्षा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.