Savitri Bai Phule Aadhar Yojana: ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘सावित्रीबाई फुले आधार योजना 2025-26’ सुरू; 17 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम संधी. योजना तपशील आणि पात्रता जाणून घ्या.
सावित्रीबाई फुले आधार योजना 2025-26 सुरू – विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय
मुंबई | राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागासवर्ग (SBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025-26’ लागू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळणार आहे, जे त्यांच्या भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्य खर्चासाठी वापरता येणार आहे.Savitri Bai Phule Aadhar Yojana
महत्वाची बातमी : PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹2000 हप्ता,लगेच यादी चेक करा

पात्रता आणि निवड प्रक्रिया
या योजनेचा लाभ महापालिका, विभागीय शहरे, जिल्हा आणि तालुका स्तरावरील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. निवड प्रक्रियेनुसार, प्रथम ते चतुर्थ वर्षात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पात्र ठरवले जाणार आहे.
एकूण ६०० विद्यार्थ्यांची निवड होणार असून, दरवर्षी १५० विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.
फक्त वसतीगृह मिळाले नसलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.भटक्या जमाती ‘क’ प्रवर्ग व ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना’ अंतर्गत लाभ घेत असलेले धनगर समाजातील विद्यार्थी वगळले जातील.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2025
पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज 17 ऑगस्ट 2025 पर्यंत खालील अधिकृत संकेतस्थळावर सादर करावेत:
👉 https://hmas.mahait.org
> टीप: कोणतेही ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
कोणते कोर्सेस पात्र आहेत?
पदवी अभ्यासक्रम: बी.ए., बी.कॉम., बी.एससी.
पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रम: एम.ए., एम.एससी.
या कोर्सेसमध्ये १२ वी नंतर प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज कधी?
सध्या केवळ अव्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज सुरू असून, व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होणार आहे.Savitri Bai Phule Aadhar Yojana

अधिक माहितीसाठी संपर्क
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.
सहायक संचालक योगेश पाटील यांनी गरजू विद्यार्थ्यांना या योजनेतून आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
या योजनेचा महत्व
या योजनेमुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होतो. शासकीय वसतीगृह न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मदत होऊन, शिक्षणात सातत्य राखता येते. विशेषतः महिलांसाठी, अल्पसंख्याक आणि भटक्या जमातीतील तरुण-तरुणींना शिक्षणात सक्षम बनवण्याचा शासनाचा उद्देश या योजनेतून दिसून येतो.Savitri Bai Phule Aadhar Yojana:
संबंधीत बातम्या👇🏻
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?:कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर