पंजाबराव डख हवामान अंदाज | प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेला अंदाज – 11 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांनी या काळात शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत असा सल्ला.
महत्वाची बातमी : PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹2000 हप्ता,लगेच यादी चेक करा
राज्यात मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकरी सुखावले होते. खरिपाच्या पेरण्या वेळीच झाल्या आणि उगम चांगला दिसून येत होता. मात्र आता हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काही दिवस काय हवामान असेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अत्यंत महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे.

हे पण वाचा – “भारताची अर्थव्यवस्था मृत, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट ने जगभर खळबळ”
राज्यात पुढील १०-१२ दिवस कोरडे
पंजाबराव डख यांनी सांगितले की, २९ जुलैपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून अनेक भागांमध्ये सूर्यदर्शन सुरू आहे. हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून १ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड राहील असे त्यांनी नमूद केले.
या दरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये स्थानिक वातावरणामुळे हलकासा पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी सर्वदूर पावसाचा जोर अजिबात दिसून येणार नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या काळात हवामान कोरडेच राहील.
https://x.com/RMC_Mumbai/status/1950830995038511546?t=kx5yTQM29o3NV9kufUZxPw&s=19
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा काळ
डख यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, या कोरड्या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतीशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत. विशेषतः:
तणनाशक फवारणी
खतांची मात्रा देणे
पिकांचे निरीक्षण
कीड नियंत्रणासाठी उपाय
ही कामे आता तातडीने करून घेण्याची गरज आहे, कारण ११ ऑगस्टनंतर पुन्हा हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

११ ऑगस्टनंतर पावसाचे पुनरागमन
पुढील अंदाजात डख यांनी म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे पेरण्या झालेल्या भागांमध्ये पिकांना फायदा होईल. मात्र त्याआधी जो कोरडा कालावधी आहे, त्यात शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक कामे पार पाडावीत, अन्यथा पुढील पावसात अडचणी येऊ शकतात.या अंदाजाच्या आधारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा योग्य आराखडा तयार करावा, हेच शहाणपणाचे ठरेल.
टीप: हवामान अंदाज वेळोवेळी बदलू शकतो. शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी विभाग, कृषी विद्यापीठ किंवा हवामान केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार निर्णय घ्यावा.
संबंधीत बातम्या👇🏻
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?:कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर