Jain Chaturmas 2025 Jalgaon : जळगाव येथील आर.सी. बाफना स्वाध्याय भवनात प्रसिद्ध जैन महासाध्वींच्या उपस्थितीत चातुर्मासाला भक्तिपूर्ण प्रारंभ झाला.चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा धर्म, ध्यान व संयमाचा पर्वकाळ, जिथे साधू-साध्वी एकाच ठिकाणी वास्तव्य करून भक्तांसोबत आध्यात्मिक मार्गदर्शन करतात. या कालावधीत प्रवचन, स्वाध्याय, ध्यानधारणा यांचे आयोजन होते.Jain Chaturmas 2025 Jalgaon

जळगाव, दि.10 (प्रतिनिधी) – जळगावच्या आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे जैन महासाध्वी प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा.महासतीजी ‘सुधा’, महासती डॉ. श्री उदितप्रभाजी म.सा. ‘उषा’, महासती डॉ. श्री हेमप्रभाजी म.सा. ‘हिमांशू’ महासती डॉ. इमितप्रभाजी म.सा., महासती श्री. उन्नतीप्रभाजी म.सा., महासती श्री. निलेशप्रभाजी म.सा. आदी ठाणा ६ यांचा चातुर्मास आयोजित करण्यात आलेला आहे.

आज चातुर्मासाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात व तपआराधनेने झाला. महासतीजींचा मागील चातुर्मास हैद्राबाद – तेलंगणा येथे होता. जळगाव श्री संघातर्फे करण्यात आलेल्या चातुर्मासाच्या विनंतीला प्रतिसाद देत त्या १३०० कि.मी. चा पायी प्रवास करत त्या जळगावात पोहोचलेल्या आहेत.Jain Chaturmas 2025 Jalgaon
आजच्या धर्मसभेत तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या विविध भागातून श्रध्दाळू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. माजी मंत्री सुरेशदादा जैन, सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष व संघपती सेवादास दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन विशेषत्वाने उपस्थित होते. सुरेशदादांनी आपल्या मनोगतात जळगावच्या एकतेचे देशात नाव निघते असा उल्लेख करून महासतीजींचे स्वागत व येथे चातुर्मासार्थ आगमनाचे कौतुक करत आभार मानले. उपस्थितांना या चातुर्मासाचा आपण विशेष लाभ घेऊन त्याला सार्थ बनवू या, ऐतिहासिक बनवू या. मागील काळात स्व. भवरलालजी जैन, स्व. रतनलालजी बाफना यांच्यासह माजी खासदार ईश्वरबाबुजी जैन यांच्या प्रयत्नांचा गौरवोल्लेख केला. आपण या परंपरेचे पाईक असल्याचा सार्थ अभिमान आहे असे ही ते म्हणाले. आजच्या सभेचे सुत्रसंचालन सीए अनिल कोठारी यांनी केले. Jain Chaturmas 2025 Jalgaon
भारतीय सभ्यता आणि जैन दर्शनमध्ये चातुर्मास काळाचे विशेष महत्त्व अधोरेखित केलेले आहे. या काळात धर्म आराधना, जप, तपस्या, धार्मिक अनुष्ठान व धार्मिक कार्यशाळांचे आयोजन केले जाते, त्या योगे जिज्ञासू सुश्रावक-सुश्राविका यांना जैन आगम व जैन सिद्धांतांची नव्याने ओळख होत प्रेरणा मिळते. जळगावातही या दरम्यान विविध धार्मिक आयोजनांसह तीर्थंकरांच्या व महापुरुषांच्या जयंत्या तसेच दीक्षा दिवस साजरे करण्याचे नियोजन आहे असे श्री संघातर्फे कळविण्यात आले आहे. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी आजच्या प्रारंभिक प्रवचनाचा लाभ घेतला. Jain Chaturmas 2025 Jalgaon