जळगाव / मुंबई ;- गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी नियमबाह्य झालेल्या कामाच्या निषेधार्थ बंद पुकारला असून यामुळे शेतकऱ्यांचा माल बाजार समितीमध्ये येण्याचे बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करून शासनाने यात हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडताना केली . यावर मुख्यमंत्र्यानी या बंदबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
बाजार समितीची भिंत विकासकाने पाडलयाच्या निषेधार्थ आडत व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे . मागण्या मान्य होईपर्यंत बंद कायम ठेवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला असून व्यापारी संकुल उभारणीला आपला विरोध दर्शविला आहे . तसेच आज जिल्ह्यातील बाजार समितीच्या आडत व्यापाऱ्यांनी एकदिवसीय बंद पुकारून जळगाव बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे.
या बंदच्या मुद्द्यावर बोलताना आज विधानसभेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रश्न उपस्थित करून नियमबाह्य काम झाल्याने शेतकऱ्यांचाही मोठे नुकसान होत असल्याने भाजीपालाही महाग झाला आहे . यासाठी बंद मागेघेऊन सुरळीत व्यवहार होण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी खडसे यांनी केली . याला उत्तर देताना मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने व्यापाऱ्यांना न्याय मिळेल का ? त्याच जागेवर भिंत बांधण्याची मागणी पूर्ण होणार का ?अशी चर्चा जिल्ह्यात दिवसभर सुरु होती .