व्यापाऱ्यांनी हट्ट सोडावा ; मनपाच्या परवानगीनेच भिंत उभारणार
जळगाव ;- गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. मात्र त्यांनी आपला हट्ट सोडून जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुल हे मनपाच्या परवानगीने आणि कायद्याच्या चौकटीत राहून होणार असल्याचा ठाम निर्धार बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी बोलताना व्यक्त केला . सर्व्हिस रोड हा होणारच आहे .
मात्र व्यापारी संरक्षक भिंत ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी भिंत उभारणीची मागणी करत आहे . परंतु सर्व्हिस रोड हा नियमानुसारच सोडला जाऊन मनपाकडून बांधकाम परवानगी मिळाल्यास २५ फुटांची उंच भिंत बांधण्यात येणार आहे . जुनी भिंत हि ५ फुटांची होती. त्यामुळे माल चोरीस जाण्याच्या घटना घडल्या आहेत . मात्र हि भिंत बांधल्यास माल चोरीस जाणार नाही असेही सभापती कैलास चौधरी यांनी स्पष्ट केले . मनपा आयुक्तांकडे व्यापारी संकुल आणि भिंत बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे . त्याची परवानगी लवकरच होऊन १८२ व्यापारी संकुलाचे बांधकामाला टेंडरधारकाडून सुरुवात करण्यात येणार आहे. व्यापाऱयांना २००० स्क्वेअर फूट जागा भाडेतत्वावर उपल्बध करून दिली असता काही व्यापाऱयांनी जागेच्या पुढे शेड उभारून गोडाऊन भाड्याने दिले आहेत . तसेच सर्व्हिस रोड आणि व्यापारी संकुलाची जागा सोडल्यास व्यापाऱयांना ५० फूट इतकी चार ट्रक एकावेळेस उभे राहू शकतील इतकी जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची जी मागणी आहे , ती त्यांनी सोडून बाजार समितीला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहनही कैलास चौधरी यांनी केले .
मनपाकडून २९ एकर जागेला मंजुरी
नशिराबाद रोडवरील दूरदर्शन टॉवरजवळ २९ एकर जागा खरेदीला मनपाने मंजुरी दिली आहे . येत्या ३० सप्टेंबरपर्यंत २ कोटी रुपये भूसंपादन विभागाला द्यायचे आहेत . याठिकाणी बाजार समितीचे नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे . या ठिकाणी अद्यावत कोल्ड स्टोरेज , गोडाऊन , दुकानांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडून व्यापारी , शेतकरी बांधवाना याचा फार मोठा उपयोग होणार असल्याचे सभापती कैलास चौधरी यांनी सांगितले .