Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

najarkaid live by najarkaid live
January 17, 2025
in जळगाव
0
प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगांव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी अमळनेर येथील पिंपळे तालूक्यातील अनुदानित आश्रम शाळेत संपन्न झाला. या प्रदर्शनात 17 शासकीय व 34 अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपकरणे सादर केली. यावेळी उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट तयार करण्यात आले होते ज्यात चार बीटमधून प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन उपकरणांना प्रदर्शनासाठी निवडण्यात आले. या प्रदर्शनात अनुक्रमे 14, 12 आणि 26 उपकरणांचा सहभाग होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात अरुण पवार यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचे महत्त्व पटवून दिले आणि प्रयोगशीलता व नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचे आवाहन केले. प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) दौऱ्यावर नेले जाईल असे त्यांनी जाहिर केले.

समारोप व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय अनिल झोपे, प्राचार्य, डायट जळगाव यांनी भूषवले. यावेळी अनिल झोपे यांनी डायट जळगावच्या वतीने आदिवासी आश्रम शाळांसाठी शैक्षणिक मदत व सुधारणा यासाठी कायमस्वरूपी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तीनही गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना स्टेट बँक ऑफ इंडिया, यावल यांच्या वतीने इन्सिनरेटर भेट देण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकचे क्षेत्रीय व्यवस्थापक धर्मेंद्र कुमार सिंग यावलचे शाखा व्यवस्थापक राधेश्याम ताराचंद मूंगमुळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. सी. डी. साळुंखे,  विद्या पाटील, युवराज पाटील उपस्थित होते.  कार्यक्रमाचे निरीक्षण व मूल्यांकन कार्य विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे, बी. बी. ठाकरे व डी. के. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहा प्रकल्प अधिकारी पवन पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल व अनुदानित आश्रम शाळा, पिंपळे यांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आहारावर नियंत्रण,आरोग्य उत्तम…” आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या परिसंवादाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद..

Next Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, २०२३-२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, २०२३-२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us