पाचोरा,(किशोर रायसाकडा)- अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने वाळू माफीयांनी वाद घालत महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पदकातील तलाठ्याला एकाने ट्रॅक्टरवरून खाली ओढले. ही घटना अंतुर्ली खुर्द तालुका पाचोरा येथे रविवारी सायंकाळी झाली याबाबत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
राज भाऊसाहेब पाटील, दुर्गेश उर्फ नानू भाऊसाहेब पाटील, विवेक उर्फ भावड्या वसंत पाटील, निंबा पाटील सर्व राहणार अंतुर्ली खुर्द तालुका पाचोरा. अशी अटक करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावे आहेत. अंतुर्ली खुर्द येथे अवैधरीत्या वाळूचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती यानंतर महसूल विभागातील चार जणांचे पथक या गावात पोहोचले. त्यात निपाणे तलाठी तात्याराव माणिकराव सपकाळ, बाळद बुद्रुक ते तलाठी आतुल बाबुराव पाटील, पुनगाव ते तलाठी तेजस रोहिदास बराटे, व पाचोरा तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर यांचा समावेश होता. पथक तिथे पोहोचले त्यावेळी एक ट्रॅक्टर गिरणा नदी पात्रातून येताना दिसले पथकातील तलाठ्यांनी थांबवले असता वाळूमाफ यांनी पथकाला मारहाण केली तलाठी अतुल पाटील ट्रॅक्टरव चढलेअसता त्यांना खाली ओढत वाळू माफिया यांनी ट्रॅक्टर पळून नेले त्याठिकाणी 64 हजार रुपयांची अवैध वाळूचा थप्पा जप्त करण्यात आला.