जळगाव – गेल्या तीन-चार दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे अजित पवार यांच्या गटात वाटेवर असल्याचे चर्चा होती. खुद्द देवकर यांनी अजित पवार यांच्या सोबत पक्षात प्रवेश करण्याबाबत चर्चा देखील झाल्याचे माध्यमांना सांगितले होते. यात आज देवकरांचे शिष्टमंडळ यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
मात्र अजित पवार यांनी शिष्टमंडळांतील देवकरांच्या सदस्यांना सध्या तरी पक्षात कोणालाही प्रवेश नाही असे सांगून देवकारांचे प्रवेशाचे दरवाजे बंद असल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघामधून शरद पवार गटात कडून गुलाबराव देवकर हे उमेदवार होते. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी त्यांचा पराभव केला. पराभवानंतर देवकर व त्यांचे कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात जाण्याबाबत निर्णय घेतला त्यानुसार अजित पवार यांच्याशी चर्चा व झाली असल्याची माहिती समोर आली. मात्र जळगाव ग्रामीण मधील अजित पवार गटातील पदाधिकारी यांनी गुलाबराव देवकर यांना पक्षात घेऊ नये, असा आग्रह अजित पवारांकडे केला. याबाबत गेला तीन-चार दिवसापासून पक्षप्रवेशाची तसेच गुलाबराव देवकर यांना पक्षात न घेण्याबाबत हालचाली होत होता.
देवकरांच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट
गुलाबराव देवकर यांनी पक्षाप्रवेशाबाबत आज चव्हाण व युवा जिल्हाध्यक्ष यांनी अजित पवार यांची भेट घेतली. भेटी दरम्यान दोघांना अजित पवारांनी स्पष्ट सांगत सध्या कोणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे हताश होत पुन्हा जळगावकडे रवाना झाले.
अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी पवारांची घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर महाजन, अरविंद मानकरी, रमेश पाटील, श्याम पाटील, नाटेश्वर पवार, पुष्पा महाजन, कल्पना अहिरे यांच्यासह ग्रामीणचे पदाधिकारी यांनी पवार यांची भेट घेऊन गुलाबराव देवकर यांना पक्षात घेऊ नका अशी मागणी केली. यावर अजित पवार यांनी कोणालाही पक्षात घेतले जाणार नाही अशी ग्वाही दिली.