जळगाव, : “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” हे गाणं म्हणत शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या नर्सरी, ज्युनियर केजी व सिनियर केजी या प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी जळगाव एमआयडीसी येथील तुलसी जेली स्वीट्स या चॉकलेट फॅक्टरीची मोठ्या उत्साहाने सफर केली.
तुलसी जेली स्वीट्स फॅक्टरीचे प्रोडक्शन हेड सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण भेटीची जबाबदारी घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण प्लांटची सैर घडवली. ज्यामध्ये त्यांच्या जेलीच्या विविध उत्पादनांच्या श्रेणीबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना ते वैयक्तिकरित्या उत्पादन प्रक्रियेतून टप्प्याटप्प्याने घेऊन गेले. उत्पादन प्रक्रियेत प्रवेश करण्यापूर्वी कच्च्या मालाची चाचणी कशी होते ते विद्यार्थ्यांनी कुतूहलतेने पाहिले तसेच स्वयंचलित प्रणालीच्या युनिट्सचे कार्य आणि महत्त्व यांचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले. त्यात कच्च्या मालाचे मिश्रण तयार करून ते नंतर आवश्यक आकारात तयार केले जाते. एकदा मोल्डिंग पूर्ण झाल्यानंतर, ते बेक केले जाते आणि नंतर कूलिंग ट्रीटमेंटमधून जाते. शेवटी, विद्यार्थ्यांना प्लांटच्या पॅकेजिंग युनिटमध्ये नेण्यात आले जेथे सर्व वस्तू विविध पॅकेजेसमध्ये पॅक केल्या जात होत्या. यावेळी त्यांना कच्चा माल घेण्यापासून ते अंतिम पॅकेजिंगपर्यंत सर्व काही समजावून सांगण्यात आले व या शैक्षणिक भेटीच्या शेवटी सर्व सहभागी चिमुकल्यांना ते सांभाळू शकतील एवढ्या जेली चॉकलेट त्यांच्या मुठीत व खिश्यात देण्यात आल्या. यावेळी विध्यार्थ्याचा चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत होता. या एक दिवसीय शैक्षणिक सहली ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच शिक्षिका वैशाली काळे, नेहा शिंपी, कोमल सूर्यवंशी, अनुराधा पाटील, सुरुची सोनी, वर्षा मोहिते, तनुश्री महाजन, मयूर राणे आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. सदर सहलीचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी व मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी अभिनंदन केले.
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी अनुभवली “जेली फॅक्टरीची” सफर
प्राथमिक वर्गाच्या विध्यार्थ्यानी कुतुहलतेने जाणून घेतली फॅक्टरीच्या कामकाजाची माहिती ; मुठभर जेली चॉकलेट हातात मिळताच विध्यार्थ्याचा जल्लोष