पाचोरा/जळगाव,(प्रतिनिधी)- पाचोरा – भडगाव मतदार संघांतून तिसऱ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील यांची महायुतीच्या सरकारमध्ये राज्य मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याबाबत आ. किशोरआप्पा पाटील यांच्याशी ‘नजरकैद’ बोलतांना दुजोरा दिला आहे.
पाचोऱ्याचे कार्यसम्राट आमदार म्हणून किशोरअप्पा पाटील यांची ओळख असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोरअप्पा पाटील यांना माणसपुत्र मानलं आहे. गेल्यावेळेस अनेकदा किशोरआप्पा पाटील यांचं नाव मंत्रीपदाच्या चर्चेत आलं मात्र संधी न मिळाल्याने यावेळेस राज्यमंत्री पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीची सत्ता आल्यामुळे मंत्रिपदाकडे अनेक आमदारांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या वेळच्या मंत्र्यांच्या रांगेत अनेक नावे सहभागी होण्याची संभाव्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये जामनेर विधानसभा क्षेत्राचे गिरीश महाजन हे सलग सातव्यांदा विजयी झालेले आहेत. यानंतर पूर्वीची शिवसेना व आताच्या शिंदे शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांना पाचव्यांदा विजयश्री मिळवली आहे. यानंतर भुसावळचे उमेदवार संजय सावकारे हे चौथ्यांदा सलग विजय झालेले आहेत .