जळगाव दि. 16 ( प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा / काळी पिवळी टॅक्सी परवानाधारक यांना आवाहन करण्यात येते की, शासन निर्णयानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे स्थापन करण्यात आलेले आहे. सदर कामकाजाची नियमावली कार्यपध्दती नमूद करण्यात आलेल्या आहेत. मंडळाचे जिल्हास्तरीय कामकाज संबंधित प्रादेशिक / उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून करण्यात येणार असून त्याबाबतची माहितीचे सर्व ऑटोरिक्षा परवानाधारक यांनी अवलोकन करुन सदर संधीचा लाभ घ्यावा,
१. ऑटोरिक्षा परवानाधारक ऑटोरिक्षा/मिटर्ड टँक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
२. मंडळाचा सदस्य होणेकरीता नोंदणी शुल्क ओळखपत्र शुल्काची रक्कम रु.५००/- अशी राहील व वार्षिक सभासद शुल्क रु. ३००/- असेल तसेच सभासद शुल्काची रक्कम ही ऑनलाईन प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच शुल्काबाबत राज्यस्तरीय मंडळांनी वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असेल.
३. जळगाव जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत या बाबततची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
ज्या ऑटोरिक्षा परवाधारकांनी मंडळाकडे नोंदणी केलेली असल्यास अशा ऑटोरिक्षा परवानाधारक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथून ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावेत.
५. मंडळाचा सभासद होण्यासाठी अर्जदाराने महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटोरिक्षा/ मिटर्ड टँक्सी अनुज्ञप्ती व बॅज धारण केलेला असणे बंधनकारक आहे.
६. पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. तथापि कुटुंबातील सदस्य संख्या ही जोडीदार व मुले मिळून ४ पर्यंत मर्यादीत केलेली आहे.
७. जो सभासद सलग एका वर्षांपेक्षा जास्त काळ मंडळाची वर्गणी अथवा मंडळाने विहीत केलेली इतर रक्कम मंडळाकडे अदा करणार नाही अशा सभासदाचे सभासदत्व सुनावणीची एक संधी देवून रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
८. परवानाधारक जर अपंग झाला तर तो परवानाधारक देखील कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
१. परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा परवाना त्याच्या कायदेशीर वारसास हस्तांतरीत करण्यात येईल, मयत परवानाधारकाचा कायदेशीर वारस त्याच्याकडे अनुज्ञप्ती / बॅज नसेल तरी सदर कायदेशीर वारस कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
सदर कल्याणकारी मंडळाच्या कामकाजाबाबत व राबविण्यात येणा-या योजनांबाबत शासनाकडून वेळोवेळी कळविण्यात येईल
तसेच वर नमूद करण्यात आलेल्या बाबीच्या अनुषंगाने तसेच सोबत जोडण्यात आलेल्या शासन निर्णयाने अवलोकन करुन जास्तीत जास्त ऑटोरिक्षा परवानाधारक / टॅक्सी मिटर्ड चालकांनी लाभ घ्यावा, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव नितीन सावंत (अ.का.) यांनी कळविले आहे.