पाचोरा – पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव बँक व जय किरण प्रभाजी पतसंस्था यांचे चेअरमन माननीय अतुल भाऊ संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना व या पुस्तके बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यानंतर पाचोरा पीपल बँक ग्राउंड वर भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला एकूण 45 लोकांनी रक्तदान केले त्यानंतर बँकेमध्ये शहरातील विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर लोकांनी सत्कार करून अभिष्टचिंतन केले.

यावेळी पीपल बँकेचे संचालक जीवन भाऊ जैन ॲड.अविनाश भालेराव, विकास वाघ,ॲड.आण्णासाहेब भोईटे,शरद पाटे,ॲड. स्वप्निल पाटील, पवन अग्रवाल देवेंद्र, कोटेचा शरद पाटील प्राध्यापक डॉ.अस्मिता पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुक्तार शहा माजी, नगरसेवक नंदकुमार सोनार ,माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब डी एम पाटील, माझी जि.प. सदस्य उद्धव मराठे, माजी नगरसेवक,दत्ता पाटील ,माजी नगरसेवक भरत खंडेलवाल, शिवसेना नेते पप्पू राजपूत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. रक्तदान शिबिर ॲड. अविनाश भालेराव यांच्या संकल्पनेतून अतुल भाऊ संघवी मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आले होते. रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या सहकार्याने पार पडले ब्लड बँकेचे डॉक्टर वीरेंद्र बिराडे,अमोल पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील हे उपस्थित होते यावेळी पीपल बँकेचे सीईओ राजेंद्र पाटील व कर्मचारी पदाधिकारी यांनी यावेळी सहकार्य केले.










