मुंबई,(प्रतिनिधी)- (maharashtra government) राज्याचे पावसाळी अधिवेशन (mansoon session) सुरु असून सरकारच्या माध्यमातून विविध योजनांची घोषणा करण्यात आल्या असून यापैकी (lek ladki yojna) लेक लाडकी योजनेची उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar ) यांच्याकडून घोषणा करण्यात आली असून महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये मिळणार आहे.
भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर ; एकनाथ खडसेंच्या संवादचा व्हिडीओ तुफान व्हायरल
स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. या महिलांना संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी घोषणा करत आहे. ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल.
मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण- अजित पवार अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री अन्नपुर्ण योजनाही जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना 8 लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबियातल्या मुलींना 100 टक्के फी भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
https://youtube.com/shorts/NOLb6_i3KGI?si=9NNmW9IHx5W9Fz17










