पाचोरा, (किशोर रायसाकडा)- येथील तहसील कार्यालय आवारात अवैध वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर कार्यालयाच्या गेटचे कुलुप तोडून पळवून नेण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७:३० वा हा प्रकार तहसील मधील कर्मचाऱ्यासमोरच घडला. त्याने अडवण्याचा प्रयत्न केला असता कर्मचारी यास ट्रॅक्टरची धडक देऊन चालक ट्रॅक्टरसह पसार झाला या प्रकरणी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तहसील आवारात अवैध वाळू वाहतूकीचे जप्त केलेले ट्रॅक्टर लावण्यात आले होते.तहसील कचेरीचे गेट कुलूप लावून बंद असताना कुलूप तोडून सुरज भरत पाटील २३ रा जारगाव ता. पाचोरा व एक अज्ञात, अशा दोघांनी वाळूचे ट्रॅक्टर सुरू करून पळवून नेले.हे करत असताना कर्तव्यावर असलेला तहसीलमधील कर्मचारी गोपीचंद जगन्नाथ महाजन याने तात्काळ ट्रॅक्टरला अडविण्याचा प्रयत्न केला असता यावेळी त्यास सुरज याने गोपीचंद याला शिवीगाळ करीत ट्रॅक्टरचा धक्का लावून जखमी केले व ट्रॅक्टर पळवून नेले.तहसील कर्मचारी गोपीचंद महाजन याने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके करीत आहेत.
बुधवारी निवडणूक प्रक्रिया सुरू होती त्यामुळे सर्व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत असतांना त्याचा फायदा घेत हा प्रकार घडला आहे.यावेळी समंधीतावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चव्हाणके,तहसीलदार, पाचोरा










