Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Raver Loksabha : भाजपा उमेदवार रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळला, तक्रारदार कोर्टात दाद मागणार

najarkaid live by najarkaid live
April 26, 2024
in Uncategorized
0
Raver Loksabha : भाजपा उमेदवार रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळला, तक्रारदार कोर्टात दाद मागणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- रावेर लोकसभेचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार संजय प्रल्हाद कांडेलकर यांनी आज दिनांक २६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात लेखी अर्ज देऊन आक्षेप घेतला दरम्यान अपक्ष उमेदवार यांनी आक्षेप घेतांना पुरावे सादर न केल्याने सदर आक्षेप फेटाळण्यात येत असल्याचे व भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांचा अर्ज वैध असल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय दिला आहे.दरम्यान आक्षेप फेटाळल्या नंतर या निर्णया विरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी सांगितलं

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेले आदेश पुढील प्रमाणे

ज्याअर्थी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 करिता 04-रावेर लोकसभा मतदार संघांतर्गत दि. 25/04/2024 पर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया दि. 26/04/2024 रोजी स. 11.00 वा. आयोजित करण्यात आली होती व सर्व उपस्थितांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या आहेत;

आणि ज्याअर्थी नानिर्देशित उमेदवार श्रीमती खडसे रक्षा निखिल यांचे नामनिर्देशनपत्र क्र. 24/HP/2024/RO, क्र. 25/HP/2024/RO व क्र. 27/HP/2024/RO यांच्या छाननी वेळी इतर नामनिर्दिष्ट उमेदवार श्री. संजय प्रल्हाद कांडेलकर यांनी स. 11.26 वा. तोंडी आक्षेप घेतला असता, त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले व तोपर्यंत सदर तीनही अर्जाची छाननी प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात येऊन पुढील नामनिर्देशित उमेदवारांचे अर्ज छाननीसाठी घेण्यात आली.

आणि ज्याअर्थी श्री. संजय प्रल्हाद कांडेलकर यांनी आज दि. 26/04/2024 रोजी स. 11.49 वा लेखी स्वरुपात 02 प्रतींमध्ये आक्षेप सादर केला आहे. सदर आक्षेप अर्जाची प्रत , उमेदवार श्रीमती खडसे रक्षा निखिल यांचे निवडणूक प्रतिनिधी श्री. तुषार किसन राणे यांना पुरविण्यात आली आहे.

सदर लेखी आक्षेपातील तपशिल पुढीलप्रमाणे आहे

“उमेदवार श्रीमती खडसे रक्षा निखिल यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांमध्ये त्यांचेवर गौणखनिज प्रकरणात एस.आय.टी. चौकशी अहवालामध्ये संपूर्ण परिवारामध्ये 137 कोटी दंड बुडविला म्हणून त्यांचेवर त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता यावर बोजे बसविणेबाबत आदेश असताना त्यांना या प्रकरणात सहज स्थगिती दिलेली असता, या प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद येथे अपील दाखल केलेले आहे व त्यावर दि. 30/04/2024 रोजी म्हणणे सादर करावे, असे मा. न्यायालयाने सांगितले आहे. तरी, मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून छाननी अर्जावर निर्णय घेण्यात यावा.”

आणि ज्याअर्थी प्रकरणात आक्षेपक श्री. संजय प्रल्हाद कांडेलकर (उमेदवार) यांचा आक्षेप हा कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय दाखल केलेला आहे व सदर आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ कोणताही पुरावा सादर केलेला नाही; तसेच, सदरच्या आक्षेप अर्जामध्ये त्यांनी कुठेही नामनिर्देशित उमेदवार श्रीमती खडसे रक्षा निखिल यांचे नामनिर्देशनपत्र क्र. 24/HP/2024/RO. क्र. 25/HP/2024/RO व क्र. 27/HP/2024/RO हे अवैध ठरविण्यात यावेत, अशी मागणी केल्याचे दिसून येत नाही;

आणि ज्याअर्थी नामनिर्देशित उमेदवारांची नमूना 3अ मधील दैनंदिन यादी दि. 25/04/2024 रोजी दु. 03.00 वाजेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द केलेली आहे. तसेच, उमेदवारांच्या शपथपत्रांच्या प्रतीही नोटीस बोर्डवर आणि मा. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या आहेत. आक्षेपक यांनी आवश्यकता असल्यास प्रति-शपथपत्र (Counter Affidavit) दाखल करण्याची मुभा असतांनाही तसे कोणतेही प्रति-शपथपत्र (Counter Affidavit) दाखल केलेले नाही. तसेच त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे सदर प्रकरण मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे न्यायप्रविष्ट आहे;

त्याअर्थी उपरोक्त सर्व बाबीचा विचार करता, सदर आक्षेप फेटाळण्यात येत आहे. तसेच, नामनिर्देशित उमेदवार श्रीमती खडसे रक्षा निखिल यांचे नामनिर्देशनपत्र क्र. 24/HP/2024/RO, क्र. 25/HP/2024/RO व क्र. 27/HP/2024/RO इतर सर्व बाबीने परिपूर्ण असल्याने “वैध ठरविण्यात येत आहेत.

सदर आदेश हा श्रीमती खडसे रक्षा निखिल यांचे नामनिर्देशनपत्र क्र. 24/HP/2024/RO,क्र. 25/HP/2024/RO व क्र. 27/HP/2024/RO मधील भाग पाच (नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय) भाग असेल.

सदर आदेश आज दि. 26/04/2024 रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी पारीत केला असे.सदर आदेश 04 -रावेर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी आज दिनांक 26 एप्रिल रोजी जारी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रसूती करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टर विरुद्ध वरिष्ठाकडे तक्रार, संपूर्ण आपबीती वाचा

Next Post

रावेर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावांत “स्मार्ट व्हिलेज” योजना पोहचविणार

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Next Post
रावेर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावांत “स्मार्ट व्हिलेज” योजना पोहचविणार

रावेर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावांत "स्मार्ट व्हिलेज" योजना पोहचविणार

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us