Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे दोनही उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

जळगाव जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांचाही असणार उपस्थिती

najarkaid live by najarkaid live
April 24, 2024
in Uncategorized
0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे दोनही उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : महायुतीचे जिल्ह्यातीलजळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील दोनही उमेदवार हे उद्या गुरुवारी दि. २५ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करणार आहेत. याकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील तिनही मंत्री शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांचीही उपस्थिती राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्व उमेदवारांचा जोरात सुरु असून आता नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीतील घटक पक्ष भाजपाचे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार स्मिता वाघ व रक्षा खडसे यांचा उद्या दि. २५ एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज भरला जाणार आहे. त्यांची शहरातील शिवतीर्थ येथून नामांकन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत. आ. मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे, आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, आ. लता सोनवणे, आ. संजय सावकारे यांच्यासह जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मनसे रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप, पीआरपी(कवाडे गट) प्रहार, लहूजी शक्ती सेना महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती खा रक्षाताई खडसे ह्या उद्या गुरुवारी (ता.२५ एप्रिल) भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री ना गिरीशभाऊ महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या घटक पक्षांकडून यावेळी भव्य शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालय (जी.एम. फाउंडेशन) ते जिल्हाधिकारी कार्यालय, अशी भव्य पदयात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येईल.

दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष मा आ चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच भाजपचे प्रदेश महामंत्री मा. विजय भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शनाला सूरवात होईल
या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण (महायुतीचे समन्वयक), संजय पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष व महायुतीचे समन्वयक) आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार एम.के. अण्णा पाटील, माजी खासदार ए.टी. नाना पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा),अमोल हरिभाऊ जावळे (जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा), सौ. उज्वलाताई बेंडाळे ( जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा भाजपा), नंदकिशोर महाजन (भाजपा रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख), डॉ.राधेश्याम चौधरी, (भाजपा जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख), निलेशभाऊ पाटील (जळगाव जिल्हाप्रमुख शिवसेना), मा. रावसाहेब पाटील (जळगाव जिल्हाध्यक्ष शिवसेना), वासुदेव पाटील (जळगाव जिल्हाध्यक्ष शिवसेना), जमील देशपांडे (जिल्हाध्यक्ष मनसे), अभिषेक भाऊ पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगराध्यक्ष) सौ.मीनल ताई पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) सौ. सोनालीताई नारायण पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) सौ.सरिताताई माळी-कोल्हे (शिवसेना), गणेशभाऊ सोनवणे (शिवसेना), आनंदभाऊ खरात ( RPI आठवले गट), अनिल अडकमोल (आठवले RPI) राजूभाऊ मोरे (RPI कवाडे गट), दिनेश खरात (लहूजी सेना ), श्री.सुर्यवंशी (रासप) यांनी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon news: नशीब पन्नास लाखाचा लीड बोलले नाहीत – संजय राऊत

Next Post

श्रीराम पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us