पुणे ( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पंचवीस हजारा पेक्षा अधिक पत्रकार सदस्य असलेल्या संघटनेला विविध उपक्रम राबवून सामाजिक चेहरा दिला. प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी उपाय सुचवले त्यामुळे त्यांचे संघटना व सामाजिक कार्य चौफेर असल्याने त्यांचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे अशा शब्दांत मान्यवरांनी कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुणे येथील राज्यस्तरीय अधिवेशनत पत्रकार बाबा देशमाने यांनी संपादित केलेल्या प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, पत्रकार निरंजन टकले, लेखक अरविंद जगताप,महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव आमदार उमा खापरे, उपस्थितीत होत. तर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचे सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्य चौफेर असून ते दूरदृष्टी असलेले पत्रकारांचे नेते आहेत, अशा शब्दांत उपस्थित मान्यवर संपादक, पत्रकारांनी आपले मत मांडले.
संपादक बाबा देशमाने यांनी मुंडेंचा सामाजिक पत्रकारितेतील प्रवास नेमकेपणाने पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या वसंत मुंडे यांच्या कार्यक्षमता आणि चौफदृष्टी या पुस्तिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तिकेचे राज्यभरातील मान्यवर संपादक आणि पत्रकारांनी कौतुक केले आहे.
25 हजाराहून अधिक सदस्य…
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यभरात पंचवीस हजाराहून अधिक पत्रकार सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याला अडचणीच्या काळात मदत व्हावी यासाठी संघटना सक्रिय असते. पत्रकारांच्या विविध प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कायम आक्रमक भूमिका घेऊन काम करतो त्यामुळे राज्यात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या राज्य पत्रकार संघ झाला आहे. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.