Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील जागोजागी रंगवलेल्या ‘कमळ’ चिन्हावर आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे तक्रार

najarkaid by najarkaid
March 8, 2024
in जळगाव
0
जळगाव शहरातील जागोजागी रंगवलेल्या ‘कमळ’ चिन्हावर आक्षेप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी च्या वतीने ‘अबकी बार मोदी सरकार’ ही टॅग लाईन असलेलं पक्षाचं ‘कमळ’ चिन्ह जळगाव शहरातील खाजगी व शासकीय मालमत्तेवर विना परवानगी रंगविले असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जळगाव मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार शहरातील झेंडे, बॅनर इ. काढण्यास आपणाकडून सुरूवात करण्यात आली आहे परंतु भारतीय जनता पार्टी या राजकीय व सत्ताधारी पार्टीने जळगाव शहरातील खाजगी मालमत्तेवर तसेच शासकीय मालमत्तेवर  ‘कमळ‘ हे चिन्ह रंगवून जाहीरातबाजी चालविली आहे.

वास्तविक अशा राजकीय पक्षाच्या चिन्हाची भिंती रंगवून जाहीरात करावयाची असल्यास तया मालमत्ता धारकाने मनपाची सर्व देणी अदा केलेली असणे आवश्यक असते. असे सर्व सोपस्कार पार पाडून मनपाची परवानगी व चिन्ह ज्या साईजची आहे त्याप्रमाणे व जेव्हढे दिवस जाहीरात लावणार असाल त्याबाबत माहीती व दरदिवसाप्रमाणे शुल्क (शासकीय फी) व ज्या-ज्या ठिकाणी भिंती रंगवणार त्या-त्या ठिकाणची पूर्ण माहीती नमूद करणे आवश्यक असते.

शहरातील बहुसंख्य भागात बुथवाईज असलेल्या खाजगी व शासकीय मालमत्ता (उदा. शहरातून जाणाऱ्या बहिणाबाई उड्डाण पुलावर) वर चिन्ह रंगवून शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

तरी परवानगी न घेता मनपा हद्दीतील खाजगी व शासकीय मालमत्तेवर चिन्ह रंगविल्याबद्दल शहर विद्रुपीकरण कायद्याखाली सदर पक्षावर गुन्हा दाखल करून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वरील ठिकाणी रंगविण्यात आलेले  राजकीय पार्टीचे निवडणूक चिन्ह त्वरीत हटविण्यात यावी अशी मागणी आपणाकडे करण्यात येत आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी,उपाध्यक्ष किरण राजपूत,माजी नगरसेवक राजू मोरे, सुनील माळी,युवक सरचिटणीस हितेश जावळे,सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष भाऊराव इंगळे आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…तर शरद पवार म्हणतात मला ; कडक इशारा नेमका कुणाला?

Next Post

मोदी सरकारच्या 48 जागा कमी करा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन : मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेला उसळला जनसागर

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
मोदी सरकारच्या 48 जागा कमी करा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन : मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेला उसळला जनसागर

मोदी सरकारच्या 48 जागा कमी करा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन : मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेला उसळला जनसागर

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us