Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

PM मोदींकडे पुढील २५ वर्षाचे व्हिजन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

जळगावात भाजपाच्या युवा संमेलनाला युवकांची अलोट गर्दी ; मोदींच्या जय घोषाणे परिसर दानानला

najarkaid live by najarkaid live
March 5, 2024
in जळगाव
0
PM मोदींकडे पुढील २५ वर्षाचे व्हिजन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुढील २५ वर्षाचे व्हिजन असून मोदीजी भविष्यातील भारतासाठी सज्ज आहेत,२०३० पर्यंत भारताची जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवा असे आवाहनकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिनांक ५ रोजी जळगाव येथील भाजपाच्या युवा संमेलन कार्यक्रमात उपस्थिती युवक युवातींना केले.यावेळी कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीताने तर समारोप राष्ट्रगीताने झाला, अमित शहा यांना ऐकण्यासाठी संपूर्ण सभा मंडप युवकांनी तुडुंब भरला होता तर संपूर्ण परिसर मोदींच्या जायघोषाने दनाणून निघाला. अमित शहा यांनी भाषणाला सुरवात करताच उपस्थित युवकांनी मोबाईल टॉर्च लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बोलतांना अमित शहा पुढे म्हणाले की,२०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन स्थापन करणे, २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन आणि २०४० मध्ये एका भारतीयाला चंद्रावर पाठवून मून मिशन पूर्ण करण्याचा प्लॅन पीएम मोदींकडे आहे. दरम्यान भाजपला ४०० पार करण्याचे आवाहन देखील अमित शहा यांनी या सभेदरम्यान केले.

शरद पवारांनी हिशोब द्यावा – अमित शहा

शरद पवारांनी गेल्या ५० वर्षात काय केलं? याचा त्यांनी हिशोब द्यावा. मी गेल्या १० वर्षाचा हिशोब तुम्हाला देतो, असा थेट हल्लाबोल करत महाविकास आघाडीची रिक्षाचे तीनही टायर पंक्चर असल्याची टीका अमित शहा यांनी केली.

राहुल गांधींचा राहुल बाबा म्हणून उल्लेख

गेल्या दोन लोकसभेत राहुल गांधी
यांचे यान लँड झाले नाही. यावेळी राहुल गांधी तिसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत असून यावेळीसुद्धा त्यांना यश येणारं नसून राहुल बाबा म्हणून उल्लेख करत काँग्रेस वर निशाणा साधला.तर पंक्चर रिक्षा विकास करू शकत नसल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच महाराष्ट्राचा विकास करू शकेल असे शहा यांनी आपल्या भाषणा दरम्यान सांगितलं.

अमित शहांचे नवमतदारांना आवाहन

तुमच्यापैकी जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, मी खास करून त्या तरुण मित्रांना सांगायला आलो आहे की, तुम्ही त्या पक्षाला, नेत्याला मत द्या, जो भारत मातेला जागतिक स्थानावर आणू शकेल आणि एक महान भारत घडवू शकेल. ‘लोकशाही मजबूत करणाऱ्या पक्षांना मत द्या असं आवाहन त्यांनी नवं मतदारांना केलं.

नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली देशाचा विकास कसा झाला याची माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले. त्‍यांच्‍या कार्यकाळात देशाची अर्थव्‍यवस्‍था बळकट झाली असून सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे असेही ते म्‍हणाले.

मोदींनी विकास साधला

गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंतराळापासून सेमी-कंडक्टरपर्यंत, डिजिटलपासून ड्रोनपर्यंत, AI पासून वॅक्सिनपर्यंत आणि 5G पासून फिनटेकपर्यंत प्रत्येक क्षेत्रात तरुणांसाठी दरवाजे उघडण्याचे काम करत मोदींनी विकास साधला असल्याचं सांगितले.

विरोधक घराणेशाहीचे राजकारण करताय

मोदीजींना विरोध करणाऱ्या अहंकारी आघाडीतील सर्व पक्ष हे कुटुंबावर आधारित पक्ष आहेत.

सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे.

उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे.

शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे.

ममता दीदींना त्यांच्या पुतण्याला मुख्यमंत्री करायचे आहे.

स्टॅलिनला आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे.

देशातील विरोधी पक्ष केवळ घराणेशाहीचे राजकारण करत आहेत, अशा शब्दांमध्‍ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला केला. या देशाचा विचार केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. त्यामुळे आपल्याला यावेळी तिसऱ्यांदा पीएम मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,मंत्री गिरीष महाजन,केंद्रीय मंत्री भारती पवार, मंत्री विजयकुमार गावित,खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार हिना गावित, आमदार राजुमामा भोळे, डॉ. उल्हास पाटील, उज्वला बेंडाळे, जळकेकर महाराज, अमोल जावळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या सभेला येण्यासाठी बचत गटांच्या महिलांना सक्ती ; रोहिणी खडसेनीं केले खळबळजनक आरोप

Next Post

भाजपचं ३२ लोकसभा जागेवर लढण्याचं ठरलं! संभाव्य उमेदवारांची यादी वाचा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मुहूर्त ठरला ; मंत्री गिरीश महाजनांच्या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या मोठया नेत्याचा आज भाजपात पक्ष प्रवेश निश्चित, प्रवेशाची मोठी यादीच आली समोर…

भाजपचं ३२ लोकसभा जागेवर लढण्याचं ठरलं! संभाव्य उमेदवारांची यादी वाचा

ताज्या बातम्या

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us