Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा वारकरी भवनाचे सोमवारी ‘ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

najarkaid live by najarkaid live
March 2, 2024
in जळगाव
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ रोजी जळगाव दौऱ्यावर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.2 (प्रतिनिधी) –प्रस्तावित जिल्ह वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित असून  हे इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील संस्कार शिबिरे इ. माध्यमातून संस्कारी पिढी घढवण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.  जिल्हास्तरीय “ वारकरी भवन ” बांधकाम जळगाव परिसरात होण्यासाठी जिल्ह्यातील वारकरी मंडळींची व लोकप्रतिनिधींची सातत्याने मागणी  होती.त्यानुसार खेडी शिवारात ६ कोटी ०६ लक्ष निधीचे वारकरी भवन मंजूर केले असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच यासाठी सर्व खासदार व आमदार व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभल्या बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले.

    वारकरी भवनाचे भूमिपुजन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रस्तावित आहे. त्या नियोजनासाठी शनिवारी दि. २ मार्च २०२४ रोजी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात संपन्न झाली त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोमवार दि.४ मार्च २०२४  रोजी सायं. ६:०० वाजता मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते वारकरी भवनाच्या वास्तूचे भूमिपूजन होणार या भूमिपूजन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून सदर कार्यक्रम पूर्णत: वारकरी पद्धतीने पण शासकीय राजशिष्टाचार सांभाळून पार पाडावा अशी अपेक्षा व्यक्त केली.  पालकमंत्र्यांसह  जिल्ह्यातील दोन्ही मंत्री व आमदार- खासदार यांच्या सहकार्य व सहमतीने जिल्हा नियोजन समिती निधीमधून मंजूर झालेले हे वारकरी भवन महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण ठरणार असून त्यासाठी प्रशासकीय योगदान देण्याची संधी मला लाभली हे माझे भाग्य समजतो आणि वारकरी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह खासदार आमदार व जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याच्या  नियोजन बैठकीस ह.भ.प. परमेश्वरजी महाराज गोंडखेल, ह.भ.प. गोविंद महाराज केकत निंभोरा, ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, ह.भ.प. महंत संजीवदास महाराज सावखेडा, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवारकर,  ह.भ.प. सुधाकर महाराज मेहूण, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. अंकुश महाराज मनवेल, ह.भ.प. प्रतिभाताई जवखेडेकर, ह.भ.प. गजाननजी महाराज वरसाडे , ह.भ.प.  सुशील महाराज विटनेर, ह.भ.प. शाम महाराज पिंपळगाव, ह.भ.प. यशवंत महाराज कमळगाव, ह.भ.प. कन्हैया महाराज, ह.भ.प. विजय महाराजभामरे, ह.भ.प. रुपचंद बाबा दहिवदखुर्द, ह.भ.प. सदाशिव महाराज साकरीकर, ह.भ.प. दिनकर महाराज कडगावकर, यांचेसह संपूर्ण जिल्ह्यातून दिंडीचालक, वारकरी संस्थाचालक, मठाधिपती यांचेसह महिला व पुरुष कीर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले . सदर बैठकीचे संचालन ह.भ.प. प्रा.सी एस पाटील यांनी केले . गजानन महाराज यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. परमेश्वर म.,आवारकर महाराज व समाधान म.भोजेकर यांची समयोचित भाषणे झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वातावरणातील कार्बनला जैन उद्योग समूह सुरु करणार बायोचारमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रकल्प

Next Post

सैराट फेम अभिनेत्री आर्ची ‘रिंकू राजगुरू’ उद्या जळगावात

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सैराट फेम अभिनेत्री आर्ची ‘रिंकू राजगुरू’ उद्या जळगावात

सैराट फेम अभिनेत्री आर्ची 'रिंकू राजगुरू' उद्या जळगावात

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

February 24, 2026
आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us