मुंबई : मनोज जरांगे पाटीलांच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावे असून मी उद्या ईडी कडे सुद्धा तक्रार करणार असल्याचे अजय बारसकर महाराज यांनी म्हटलं आहे, कोणत्या व्यक्तीला आमदार बनायचं स्वप्न दिलं आहे त्याचे पुरावे माझ्याकडे असून जरांगे पाटलांच्या नातेवाईकांकडे ४५ डंपर कुठून आणि कसे आले याची चौकशी करण्यासाठी मी ईडीकडे जाणार असल्याचे अजय बारसकर यांनी सांगितलं. मी उद्या २५ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्याविरोधात बाॅम्ब टाकणार असल्याचं देखील ते म्हणाले.
ते म्हणाले की, मी महाराज सोबत वकील पण आहे. माझ्याकडे त्यांचा पुरावा असून माझ्याकडे मनोज जरांगेंची रेकॉर्डिंग आहे, आज मी मनोज दादा बोलत आहे. मनोज जरांगे पाटील लोणावळामध्ये बंद दाराआड का मीटिंग घेतली?असा मी प्रश्न विचारला. बंद दाराआड तुमची काय डील झाली? 14 तारखेला जी सभा झाली त्यामध्ये जरांगे पाटील यांनी सहा मागण्या केल्या होत्या. त्या सभेमध्ये तुम्ही समाजाची मागणी मान्य केली. लोणावळामध्ये सरसकट शब्द सोडून दिले. बंद दाराआड बैठक झाल्यानंतर लोणावळामध्ये सरसकट शब्द का सोडला? अंतरवली मागणीमध्ये ज्या 45 बांधवांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी सरकारी नोकरी का सुटली? अशी विचारणा त्यांनी केली यावेळी केली.
दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने देखील पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच खंडण केले असून अजय ऊर्फ खंडू महाराज बारस्कर हेकेखोर आहे, खंडणी गोळा करणे, खोटं बोलणं, ब्लॅकमेलिंग करून आपली उपजीविका चालवण्यासाठी हा काही ना काही उद्योग करत असतो, असा हल्लाबोल करीत याच्या गद्दारीचा शिक्का आता पुसला जाणार नाही.याच्या विरोधात आम्ही कारवाई करणार आहोत, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे गजेंद्र दांगट, नीलेश सुंबे, विशाल घोलप यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, राज्य सरकारने बारस्करचा दूत म्हणून वापर करून मराठय़ांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.