जालना,(प्रतिनिधी)- आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात ठाम भूमिका घेत मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही असा निश्चय करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी २४ पासून राज्यात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असून गावोगावी रास्ता रोको आंदोलन होणार आहे याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपल्या समाजाला मार्गदर्शन केले आहे दरम्यान १२ वी वर्गाच्या परीक्षा सुरू असून परीक्षा काळात विद्यार्थ्यांना अडचण यायला नको म्हणून रास्ता रोको आंदोलनात काहीसा बदल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोकोचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्याची घोषणा केली आहे.हा निर्णय शनिवार पुरता मर्यादित असून, त्यानंतर २५ तारखेला पुन्हा ते आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत.
धरणे आंदोलन गावातच
मनोज जरांगे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे पेपर सुरू असल्याने त्यांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आंदोलानात काही बदल करण्यात आले आहेत. रास्ता रोकोचे रुपांतर हे धरणे आंदोलनात केले जाणार असून, हे धरणे आंदोलन गावातच केले जाणार आहे.
आंदोलनाच्या स्वरुपात बदल
जरांगेनी हा रास्ता रोको हा २४ तारखेलाच करावा असेही बजावले आहे. त्यानंतर या रास्ता रोकोचे रुपांतर हे धरणे आंदोलनात केले जाणार आहे. या आंदोलनाचं स्वरुप पुढीलप्रमाणे असेल.
प्रस्तावित आंदोलनात शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात येईल. यावेळी सरकारच्या एखाद्या अधिकाऱ्याने म्हणजे तहसीलदार, तलाठी,ग्रामसेवक आदी अधिकाऱ्यांनी 10 वाजेपर्यंत आंदोलनस्थळी जाऊन मराठा समाजाचे निवेदन स्वीकारावे. हे निवेदन जाऊन मराठा समाजाच निवेदन स्वाकारावे . हे निवेदन स्वीकारण्यासाठी एखादा अधिकारी हजर झाला नाही, तर रास्ता रोको केला जाईल. मग याला जबाबदार जबाबदार संबंधित अधिकारी असेल. रास्ता रोको झाल्यानंतर त्याचे त्याच दिवशी सायंकाळी धरणे आंदोलनात रुपांतर होईल. त्यात गावातील मुले – मुली मराठा आरक्षणावरील आपली मते मांडतील. धरणे आंदोलनात कीतर्न, भाषण, संभाषणे सुरू ठेवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.
मंदिरात बसा किंवा ग्रामपंचायती समोर बसा, पण धरणे आंदोलन करा. पुढची दिशा काय असणार यावर पुन्हा 25 तारखेला एक बैठक घेतली जाणार आहे. मग त्या बैठकीमध्ये समाज बांधवांचा विचार घेऊन रास्ता रोको सुरू ठेवायचा की त्यामध्ये काही बदल करायचे हे ठरवले जाईल, असे ते म्हणाले.