प्रशासकीय सेवेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील व्यक्तिमत्वाचा तथा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. योगेश नन्नवरे यांचा आज वाढदिवस…वडील कालकथित दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नवरे यांच्याकडून समृद्ध वैचारिक, सामाजिक वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, माणसं फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
अगदी कमी वयात मा. श्री. योगेश नन्नवरे यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे.प्रशासकीय सेवेत काम करतांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या या व्यक्तिमत्वाचा प्रशासनात नैतिक दबदबा आहेचं.
प्रशासकीय सेवेत असतांना सुद्धा सेवेकडे कधीच नुसतीचं नोकरी म्हणून पाहिलं नाही,प्रचंड लोकसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरतपणे काम करणारे नेतृत्व म्हणूनमा. श्री. योगेश नन्नवरे यांच्याकडे पाहिले जाते. विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याचा वारसा घेऊन वाटचाल करणारे नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व दूरदृष्टी हे त्यांचे वेगळे गुण आहेत.
संघर्षाशिवाय काही मिळत नाही असं म्हटलं जातं, असं मानणाऱ्यांपैकी मा. श्री. योगेश नन्नवरे आहेत.जिद्द व तत्वांची सांगड घालून यशाची शिखरे गाठत सामाजिक विकासासाठी ते नेहमी झटत आहेत.शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी ते नेटाने काम करत करतांना आपण पाहिलं आहे. बी. एम. फाऊंडेशनच्या माध्यमातून शासनाच्या योजना गेल्या चार पाच वर्षाआधीच जनतेच्या दारी पोहचविण्यासाठी त्यांनी कार्य केलं आहे.
समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने ते सतत विविध माध्यमातून समाज सेवा करतात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यास मा. श्री. योगेश नन्नवरे नेहमीच आग्रही राहतात.प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून शैक्षणिक मदत करून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात त्यांनी आणले आहे. कोरोना या महामारीने अवघं जग हादरलं. या महामारीच्या काळात त्यांनी मोठं काम केल्याची नोंद आहेचं.
यशाची शिखरे सर करत आणि उज्ज्वल आयुष्य जगत आजपर्यंत आपण प्रवास केलात. येथून पुढेही असेच यशाची नवनवीन शिखरे सर करा. उज्ज्वल आयुष्य जगा. माझ्याकडून याच आहेत आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.