जळगाव :- जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी नांद्रा येथील सुरेश श्यामराव पाटील यांची सर्वानुमते बिनविराेध निवड करण्यात आली. तर रिक्त सदस्यपदी तरसाेद येथील पंकज साहेबराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
बाजार समितीच्या साेमवारी झालेल्या मासिक सभेत ही निवड करण्यात अाली. मासिक सभेत वसंतराव भालेराव, लक्ष्मण पाटील, प्रभाकर साेनवणे, मनाेहर पाटील, प्रभाकर पवार, अनिल भाेळे, भरत पाटील, प्रकाश नारखेडे, डाॅ. सुनील महाजन, प्रशांत पाटील, शशिकांत बियाणी, नितीन बेहडे, विमलबाई भंगाळे, सरलाबाई पाटील, सिंधुबाई पाटील, यमुनाबाई सपकाळे, पवन साेनवणे हे संचालक उपस्थित हाेते. कृषी उत्पन्न बाजार समितीत अालेला शेतकऱ्यांचा शेतमाल त्याच दिवशी विक्री हाेऊन त्वरित पैसे मिळावेत. शेतकऱ्यांसाठी मार्केट यार्डमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपसभापती पाटील यांनी सांगितले.