भुसावळ :- महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांचा दणदणीत मताधिक्याने विजय होणार असल्याचे स्पष्ट होताच भुसावळात प्रचंड जल्लोष करण्यात आला.
रक्षाताई खडसे या रावेर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. आज मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच त्यां जास्तीत जास्त मताधिक्याने आघाडीवर होत्या दुपारपर्यंत त्यांना मोठे मताधिक्य मिळाल्यानंतर शहरातील भाजप पदाधिकार्यांनी प्रचंड जल्लोष केला.
नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजप मध्ये निवडणुकी दरम्यान प्रवेश केलेले भाजपचे कार्यकर्ते विजय मोतीराम चौधरी यांनी नाहाटा चौफुलीवर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आनंद साजरा केला. याप्रसंगी विजय चौधरी म्हणाले की,भाजप शिवसेना व रिपाई आठवले यामहायुतीचा हा विजय म्हणजे सर्वसामान्यांचा मोदी साहेबांवरील विश्वासाचा आहे.जनतेला मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून मान्य होते हे त्यांनी दिलेल्या मताधिक्यामधून दिसून येत आहे. यावेळी पालिकेचे पाणीपुरवठा सभापती पिंटू ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .