जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांचे पारंपरिक राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजयदादा गरुड व विलास राजपूत हे आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते याच्या सोबत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणारं अशा चर्चा सुरु होत्या अखेर प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज दिनांक ३० रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा प्रवेश करतील अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. दरम्यान संजय गरुड यांच्या प्रवेशाने जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याने जामनेरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान आज संजय गरुड यांच्या सोबत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अनेक माजी जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पक्षाचे पदाधिकारी प्रवेश करणार असून यापैकी एक ३० जणांची नावे असलेली यादीच खात्रीलायक सूत्रांनी ‘नजरकैद‘ दिली असून या यादीत अजून महत्वाच्या काही पदाधिकारी, जि.प सदस्य यांचे नावे समाविष्ट करायचे असल्याचे सांगण्यात आले आहे.यासोबतच पाचशे कार्यकर्ते देखील संजय गरुड व विलास राजपूत यांच्या सोबत आज भाजपा पक्षात प्रवेश करणार आहेत.
संभावित प्रवेश करणाऱ्यांची यादी वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून राजीनामा
आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या गटबाजी कंटाळून संजय गरुड यांनी २५ जानेवारी रोजीचे पक्षाच्या प्राथमिक सदस्य व पदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं होतं तेव्हा पासूनच संजय गरुड हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्त्ता दुजोरा मिळाला होता.
पारंपरिक राजकीय वैर आज संपणार
जामनेर विधानसभा निवडणूकीत मंत्री यांच्या समोर आव्हान उभं करणारे पारंपरिक राजकीय विरोधक असणारे संजयदादा गरुड आज भाजपात प्रवेश करणार असल्याने दोन नेत्यांमधील पारंपरिक राजकीय वैर देखील मिटणार आहे.आज संजय गरुड भाजपा पक्ष प्रवेश करतील यावेळी त्यांच्या सोबत जवळपास पाचशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार असल्याने जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे.दरम्यान आज भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी जामनेर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी मुबंईत दाखल झाल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातं आहे.