आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. पण, तो केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही परफेक्शनिस्ट आहे. हे आम्ही म्हणत नसून त्यांचा लेटेस्ट व्हिडिओ आहे. होय, नुकतेच त्याने आपली मुलगी आयरा खानचे लग्न केले आहे. लग्नादरम्यान तो वडिलांचे कर्तव्य चोखपणे पार पाडताना दिसला. आमिरने आपल्या मुलीच्या लग्नाची सर्व जबाबदारी स्वतः सांभाळली आहे. आता लग्नाच्या 10 दिवसांनंतर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आयराला लग्न करताना पाहून आमिर रडू लागतो.
आमिर खानने आपल्या मुलीच्या डेस्टिनेशन वेडिंगचे आयोजन उदयपूरमध्ये केले होते. आधी नुपूर शिखरे आणि आयराने कोर्ट मॅरेज केले आणि नंतर उदयपूरमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. 13 जानेवारीला आमिरने मुंबईत आपल्या मुलीच्या रिसेप्शनचे आयोजन केले होते. त्या पार्टीला इंडस्ट्रीतील सर्व दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमिर खानची पहिली पत्नी त्याच्यासोबत बसलेली दिसत आहे, जी आपल्या मुलीच्या लग्नावर खूप भावूक झाली आहे.