जळगाव : अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतसह कार्यवाह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सह मंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवार यांनी आज हे आमंत्रण अशोक जैन सन्मान:पूर्वक प्रदान केले.