Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार -आमदार किशोर आप्पा पाटील

najarkaid by najarkaid
January 12, 2024
in जळगाव
0
पाचोऱ्यात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम; उपस्थितीचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(वार्ताहर) दि,१२- समाजातील सर्व वंचित उपेक्षित घटकांना विकासाच्या वाटेवर पुढे आणणार असून समाजातील दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांचे जगणे सुलभ व्हावे, त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. पाचोरा येथे दिव्यांग बांधवांच्या साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. राजमाता जिजाऊ माँसाहेब तसेच स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिवशी संपन्न झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांत अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार संभाजी पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल ,माजी जि प सदस्य पदमसिंह पाटील,संजय पाटील( भुरा आप्पा),शहर प्रमुख किशोर बारवकर, बंडू चौधरी, डॉ भरत पाटील ,युवा सेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन,माजी नगरसेवक राम केसवानी, दत्ता जडे,बापू हटकर,गंगाराम पाटील, अयुब बागवान, पंढरी आण्णा पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख इंदल परदेशी, बाजार समितीचे संचालक प्रकाश तांबे, राहुल पाटील,युसुफ पटेल आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यातील दिव्यांग बांधवांची संख्या पाहता आमदार निधीतून उपलब्ध होणारी दहा लाखाची रक्कम अतिशय तोकडी होती.त्यामुळे राज्य शासनाकडे पाठपुरावा करून हा निधी १० लाखा वरून ३० लाख रुपये करण्याचा सुधारित शासन निर्णय घेण्यास आपण भाग पाडले याचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच आमदार महोदयांना पर्यायाने दिव्यांग बांधवांना होणार असल्याचे सांगत आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आधी भडगाव तालुक्यासाठी १० लक्ष रुपयांचे साहित्य वाटप केल्याचे सांगत आज पुन्हा या तीस लाखाच्या निधीतून सुमारे सहाशेहून अधिक दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करत असल्याचे सांगितले यामुळे त्यांचे जीवन सुलभ होण्यास मदत होईल अशा पद्धतीचे साहित्य वाटप होत आहे असे सांगून, दिव्यांगांच्या तपासण्या यानंतर तालुकास्तरावर मेडिकल तपासणी शिबिरे घेऊन कराव्यात व तेथेच प्रमाणपत्र दिले तर एकही दिव्यांग बांधव शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगितले. पुरवठा विभागाने त्यांच्याकडील शिधापत्रिका अपडेट करून दिव्यागांना त्यांचा लाभ द्यावा तसेच संजय गांधी योजनेच्या पेन्शनचा लाभ दिव्यांग बांधवांना देण्यात प्रशासनाने लक्ष घालण्याच्या सूचना त्यांनी केल्या.या प्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कामाचे कौतुक करताना जिल्ह्याला तत्पर कर्तव्यदक्ष अधिकारी लाभल्यामुळे विकास कामांची गती वाढल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सुमारे सहाशे दिव्यांग बांधवांना तीस लाख रुपये आमदार निधीतून थ्री व्हील सायकल, कृत्रिम अवयव आदी प्रकारच्या साहित्याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही साहित्याचे वाटप जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मोंढळा रोड वरील तुळजाई जिनिंग मध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख एस पी गणेशकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रविण ब्राम्हणे यांनी मानले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद –  आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांगांसाठी मिळणारा दहा लाखाचा निधी आता तीस लाख रुपये झाला असून आमदारांच्या प्रयत्नाने शासनाच्या नियमात बदल झाला असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी म्हणाले. त्यांनी दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत,नगरपालिका पंचायत समिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध शासकीय कर्ज योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय उभा करावा असे सांगितले. आगामी काळात तालुकास्तरावर दिव्यांग पुनर्वसन व मदत केंद्र उभारणी करिता लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत एका चांगल्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहता आल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PM मोदींच्या नाशिकमधील भाषणातील प्रमुख १५ मुद्दे

Next Post

रेल्वेने अयोध्येला जायचेय… सतर्क राहा, रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादरीकरण का थांबले ?  ही आहे त्यामागची कहाणी

रेल्वेने अयोध्येला जायचेय… सतर्क राहा, रेल्वेने घेतला मोठा निर्णय

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us