ISRO Xposat Mission : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक मोठी कामगिरी केली आहे.
एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी लाँचिंग करुन इस्रोने 2024 वर्षाची धमाक्यात सुरुवात केली आहे.
या वर्षातील इस्रोची ही पहिलीच मोहीम यशस्वी झाल्याने इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी पीएसएलव्ही (PSLV C58) रॉकेटच्या मदतीने XPoSat उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
यानंतर सुमारे 22 मिनिटांमध्ये हा उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आला.
हा उपग्रह अंतराळातील कृष्णविवरे आणि इतर प्रमुख प्रकाश स्त्रोतांचा अभ्यास करणार आहे.