धुळे : आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण हि वाढले आहे अशातच धुळे मधून एका अपघाताची बातमी समोर येतेय भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने आमोदे फाट्यावर घडलेल्या दुर्घटनेत सोनू नाना कलगुंडे या २१ वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली.
एमएच १८ बीजे ८१६७ क्रमांकाच्या दुचाकीने निजामपूर-लामकानी रस्त्याने सोनू कलगुंडे हा जात होता. साक्री तालुक्यातील छावडी गावाच्या पुढे साक्री तालुक्यातील आमोदे फाट्यानजीक भरधाव दुचाकीवरील तरुणाचे नियंत्रण सुटले. परिणामी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सोनू नाना कलगुंडे (वय २१, रा. घाणेगाव, ता. साक्री) याला डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
अपघाताची घटना लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नामदेव सुका कोपनर यांच्या फिर्यादीवरून स्वतःच स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोनू नाना कलगुंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.