नागपूर,(प्रतिनिधी)- शहरातील कस्तुरचंद पार्क मैदानात वंचित बहुजन आघाडीची आज ‘स्त्री मुक्तीदिन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सुरू होण्यापूर्वीच सभा मंचामागील बॅनर असलेला पिलर कोसळल्याने सभा मंचावरील मागील बाजूला असलेले बॅनर खाली पडल्याने दुर्घटना घडली सुदैवाने घटनेत कुणीही जखमी झाले नसून विचारपिठावर बाळासाहेब आंबेडकर यांचे आगमन होण्यापूर्वीच व्यासपीठाचा मागचा भाग कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या घटनेमुळे एवढ्या मोठ्या मैदानात काही काळ पळापळ झाली, मात्र काहिचं वेळात सुजात आंबेडकर यांनी मागील बाजूस जात पाहणी करून परिस्थिती हाताळली.
तर शिवसेना आणि वंचितने 50-50 जागा लढणार
दरम्यान आज सभेनिमित्त नागपुरात आलेले प्रकाश आंबेडकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला असून उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे. शिवसेने आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि वंचितने 50-50 जागा लढवण्याचं आमच्या ठरलं आहे, प्रकाश आंबेडकरांच्या या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडीचं काहीच झालं नाही तर मग आम्ही 50-50 लढू. त्यांचं जागा वाटप ठरलं तर मग फॉर्म्युला वेगळा येतो. काहीच झालं नाही आणि सर्वांनी वेगळं लढायचं ठरलं तर राजकीय पक्ष म्हणून आम्हालाही लढावं लागेल. आम्हीही 48 जागा लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमानां सांगितलं.