जळगाव,(प्रतिनिधी) – शहरातील वाघनगर परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय पल्लवी योगेश पाटील या विवाहितेचा रविवार, २४ डिसेंबर २०२३ रोजी संशयास्पद मृत्यू झाला असून, तिचा घातपात झाल्याचा आरोप भाऊ मंगेश चौधरी यांनी केला आहे, तर विवाहिता कोसळल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे.मृत्यू झालेल्या विवाहितेला दोन मुली असून मुलगा होत नसल्याच्या कारनाने विवाहितेचा छळ सासरच्या मंडळी कडून करण्यात येतं असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.
जळगाव शहरातील वाघनगर परिसरात पल्लवी पाटील या वास्तव्यास होत्या. त्यांचे पती जिल्हा परिषदमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरीला असून, त्यांना दोन मुली आहेत. रविवारी पल्लवी पाटील यांच्या मृत्यूविषयी कुटुंबीयांनी त्यांच्या माहेरी फोन केला तुमची मुलगी कोसळल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे माहेरची मंडळी सासरी पोहोचली. त्यांनी विवाहितेचा मृतदेह बघितला असता त्यांना विवाहितेच्या मानेवर गळफास घेतल्याचे व्रण दिसून आले, तसेच त्यांच्या पोटावर मारहाणीच्यादेखील जखमा असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. विवाहितेने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप करीत संशय व्यक्त केला.
विवाहितेला मुलगा होत नसल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. याच कारणावरून कोरोनाकाळात विवाहिता या दहा महिने माहेरीच होत्या. मात्र, त्यानंतर त्या पुन्हा सासरी नांदण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले.घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर मयत पल्लवी पाटील यांचे वडील गणेश चौधरी, भाऊ मंगेश चौधरी यांच्यासह नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. तसेच आपल्या बहिणीला न्याय मिळावा, अशी मागणी मंगेश चौधरींनी केली.याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इतर बातम्या….
पुढील वर्षांपासून एका नवीन विषयाचा समावेश ; पहिलीपासून असणार अभ्यासक्रम!
नियमात बदल ; आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं बंधनकारक, यापुढे असं नावं लिहा…
शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’ ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
दोरीने लपेटलेला ड्रेस तुम्ही पाहून व्हाल हैराण ; उर्फीने केला बोल्ड व्हिडिओ शेअर
Lic credit card; एलआयसी क्रेडिट कार्ड वर ५ लाख विमा संरक्षणासह अनेक फायदे
साई दर्शनासाठी आलेल्या बहीण-भावंडांची शिर्डीत लॉजवर आत्महत्या
हे तुम्हाला माहीत आहेत का?, तुमच्या बँक खात्यात पैसे नाहीत तरीही काढू शकता १० हजार रुपयांपर्यंत रक्कम!
curative petition ; क्युरेटिव्ह पिटीशन ही शेवटची संधी ! मराठा आरक्षण संदर्भात क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने मान्य केली म्हणजे काय जाणून घ्या…
जगातील सर्वात जास्त विषारी वनस्पती कोणती?
शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान शोधून काढलं ; माणसाचा मृत्यू कधी होणार हे समजू शकणार
क्रिकेटच्या मैदानात मनोज जरांगेंची जोरदार फटके बाजी ; व्हिडीओ तुफान व्हायरल
















